शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्पाविरोधात 'जेल भरो'चा इशारा

By admin | Updated: July 29, 2016 19:46 IST

जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पास विरोध दर्शवत माडबन, जैतापूर, मिठगावाणे पंचक्रोशी संघर्ष समितीने प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली

मुंबई : जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पास विरोध दर्शवत माडबन, जैतापूर, मिठगावाणे पंचक्रोशी संघर्ष समितीने प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकारने २ आॅगस्टपर्यंत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, तर सरकारविरोधात जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे यांनी दिला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेबोलत होते.

वाघधरे म्हणाले की, २६ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकल्पाची पर्यावरणीय मुदत संपलेली आहे. तरीही सरकार परस्पर या प्रकल्पाला मुदतवाढ देत आहे. कायद्यानुसार प्रकल्पाचा अहवाल पुन्हा तयार करून जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. मात्र सरकार कायदा पायदळी तुवडत प्रकल्प राबवत आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून कळवले आहे.मात्र त्याचेही उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तत्कालीन आमदार आणि आताचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रकल्पाला विरोध केला होता. याठिकाणच्या स्थानिकांच्या जमिनी कंपनीने बेकायदेशीरपणे बळकावल्याचे त्यांनी चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. शिवाय प्रकल्प कशाप्रकारे कोकणासाठी धोकादायक आहे, याची अनेक कारणे मुनगंटीवार यांनीसांगितली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर मुनगंटीवार यांनी चुप्पी साधल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.