शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा डाव

By admin | Updated: June 13, 2016 04:44 IST

प्रवरा आणि मुळा या उपखोऱ्यांची निर्मिती करून जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा घाट गोदावरी एकात्मिक जलविकास आराखड्यात घालण्यात आला

संजय देशपांडे

औरंगाबाद- प्रवरा आणि मुळा या उपखोऱ्यांची निर्मिती करून जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा घाट गोदावरी एकात्मिक जलविकास आराखड्यात घालण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर ते जायकवाडी धरण या १६० कि.मी. क्षेत्रात गोदावरीचे एकच उपखोरे मंजूर असताना या दोन नव्या उपखोऱ्यांच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदावरीच्या उगमापासून पैठणच्या जायकवाडी धरणापर्यंत एकच ऊर्ध्व गोदावरी उपखोरे मंजूर होते. गोदावरी एकात्मिक जलविकास आराखडा तयार करताना या उपखोऱ्याचे ऊर्ध्व गोदावरी, प्रवरा आणि मुळा, असे त्रिभाजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या कलम ११ सी नुसार उपखोरे हाच समन्यायी पाणीवाटपाचा मूळ घटक गृहीत धरण्यात आला आहे. जायकवाडी धरणापर्यंत एक उपखोरे असेल तरच समन्यायीपद्धतीने पाणी मिळण्याचाहक्क मराठवाड्याला पोहोचतो,असा निवाडा जलनियमन प्राधिकरणाने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी दिलेला आहे. अशा परिस्थितीत तीन उपखोऱ्यांमुळे समन्यायी पद्धतीने गोदावरीचे पाणी मिळण्याचा मराठवाड्याचा हक्क आपोआप संपुष्टात येईल, असे या क्षेत्रातील माहितगार सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>नव्या उपखोऱ्यांमुळे होणार काय?समन्यायी पाणी तत्त्वानुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यानंतर ऊर्ध्व भागातील धरणे १०० टक्के भरता येतील. जायकवाडी धरण ३३ टक्के भरल्यानंतर ऊर्ध्व धरणात ५० टक्के पाणी साठविता येईल. मुळा व प्रवरा या दोन नव्या उपखोऱ्यांच्या निर्मितीमुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मागता येणार नाही. तसेच जायकवाडीत पाणी सोडण्याचे या उपखोऱ्यांना बंधन राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.मेंढेगिरी यांचा राजीनामागोदावरी एकात्मिक जल आराखड्यावर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या सल्लागारपदाचा हिरालाल मेंढेगिरी यांनी राजीनामा दिला आहे. ऊर्ध्व गोदावरी उपखोऱ्याचे त्रिभाजन करण्याच्या निर्णयावरून मतभेद झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.ऊर्ध्व गोदावरी खोऱ्याचे त्रिभाजन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. गोदावरी एकात्मिक जल आराखड्याच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत मी त्यावर आक्षेपदेखील घेतला होता. त्रिभाजनामुळे भविष्यात मराठवाड्याच्या अडचणी वाढू शकतात.