शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबापुरीत ‘जय श्रीराम’चा जयघोष

By admin | Updated: April 5, 2017 02:22 IST

शहरासह उपनगरात निघालेल्या रथयात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे रामनवमी उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.

मुंबई : रामनवमी उत्सवानिमित्त मंगळवारी मुंबापुरीत चहूबाजूूंना ‘जय श्रीराम’चा जयघोष होता. शहरासह उपनगरात निघालेल्या रथयात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे रामनवमी उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.मुंबईतील सर्वच राम मंदिरांत दुपारी एक वाजता राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. दादर येथील कात्रक रोडहून दादर टीटी-खोदादाद सर्कलमार्गे वडाळा येथील श्रीराम मंदिरपर्यंत मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. श्रीरामाची पूजा, रथपूजा, महामंगला आरती, पालखी पूजा, समराधना, ब्रह्मार्थ उत्सवासह डाळ-भात व केशरी भाताच्या विशेष प्रसादाने उत्सवाची रंगत वाढली. या ठिकाणी राम मंदिरासमोरील हनुमान मंदिरातही भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. रथोत्सवादरम्यान भाविकांसाठी अन्नदान सोहळ्याचे आयोजन केले होते. सुमारे ६५ वर्षांची परंपरा असलेल्या या राम मंदिरात आज एक लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे विश्वस्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)>एकाच ठिकाणी १५० मूर्तींचे दर्शनबोरीवली पश्चिमेकडील बाभई गावातील चोगले कुटुंबीयांच्या पुरातन राम मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. श्रीरामासह, हनुमान, विठ्ठल, श्रीकृष्ण अशा विविध देवतांच्या सुमारे १५० देवतांच्या मूर्ती या मंदिरात आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी आवर्जून गर्दी केली़उशिरापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलेचर्नी रोडमधील ठाकूरद्वार परिसरात असलेले झावबा श्रीराम मंदिर रामनवमी उत्सवानिमित्त सुगंधी फुलांसह आकर्षक रोषणाईने सजले होते. पुरातत्त्व विभागाच्या यादीतील या मंदिरात उत्सवाची सुरुवात सकाळी कीर्तनाने झाली. दुपारी भजनासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. काळ्या दगडातील ‘श्रीराम’गिरगावच्या वैद्यवाडीमधील १९० वर्षे जुन्या असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये सोमवारपासून दर्शनासाठी लगबग दिसून आली. या मंदिरातील काळ्या दगडापासून साकारण्यात आलेल्या श्रीराम, सीता, भरत, शत्रुघ्न या देवतांच्या विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी तुडुंब गर्दी केली होती. सकाळच्या आरतीनंतर दुपारी कीर्तन पार पडले. ‘हरे रामा, हरे कृष्णा’चा गजररामनवमीनिमित्त जुहू येथील इस्कॉन, श्री राधा रासबिहारी मंदिरात पहाटे साडेचार वाजल्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली. ‘हरे राम हरे कृष्ण’च्या जयघोषात भगवान श्रीरामांना महाभिषेक, महाभोग अर्पण करून महाआरती घेण्यात आली. या वेळी बॉलीवूडमधील नामांकित मंडळींनीही या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती.