शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘जय भीम’चा महाडमध्ये जयघोष

By admin | Updated: March 21, 2016 01:40 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर मानवी मूल्यांसाठी सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन : चवदार तळे सत्याग्रहाचा ८९ वा वर्धापन दिन महाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर मानवी मूल्यांसाठी सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक घटनेचा ८९ वा वर्धापन दिन रविवारी महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भीमसैनिकांच्या ‘जय भीम’च्या जयघोषांनी संपूर्ण महाड दुमदुमून गेले होते. गेल्या दोन दिवसांपासून चवदार तळे व क्रांतीभूमी परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.रविवारी सकाळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, आ. भरत गोगावले, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अ‍ॅड. आनंदराज आंबेडकर, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रशांत ठाकूर, मनोज संसारे, रिपब्लिकन एकताचे नेते गंगाराम इंदिसे आदी नेत्यांनी यावेळी अभिवादन केले. सकाळी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून प्रभातफेरी काढून संचलन केले. तर डॉ. आंबेडकर सभागृहात ११ मार्चपासून बुद्धिस्ट सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या श्रामणेर शिबिराचा समारोप माईसाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चवदार तळे मुख्य रस्ता, डॉ. आंबेडकर चौक, दस्तुरी नाका, क्रांतीस्तूप परिसराच्या मार्गावर दुतर्फा डॉ. आंबेडकर यांची पोस्टर्स, छायाचित्रे, फोटोफ्रेम, जीवनग्रंथ सीडी आदींच्या विक्रीसाठी दुकाने थाटण्यात आली होती. (वार्ताहर)