शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी जगदाळे, विरोधी पक्षनेतेपदाचा पत्ता कट

By admin | Updated: March 2, 2017 03:41 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्व पक्षांनी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मोटी बांधायला सुरुवात केली

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्व पक्षांनी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मोटी बांधायला सुरुवात केली आहे. भाजपा आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीत विजयी झालेल्या ३५ नगरसेवकांचा गट नोंदणी करून घेतला आहे. बुधवारी दुपारी कोकण भवन येथे जाऊन हा गट नोंदणीकृत केला. गटाच्या नेतेपदाची माळ ज्येष्ठ नगसेवक हणमंत जगदाळे यांच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे महानगरपालिकेची सातवी सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत ठाणेकरांनी शिवसेनेला बहुमत दिले असून विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एका अपक्षासह ३५ नगरसेवक निवडून आले आहेत. ६ मार्चला ठाणे महानगरपालिकेचा महापौर निवडला जाणार आहे. शिवसेनेकडे सत्ता स्थापनेसाठी ६७ नगरसेवकांचे बहुमत असले, तरी यात दगाफटका होऊ नये, म्हणून सेनेकडून दखल घेतली जात आहे. तशीच राष्ट्रवादीकडून घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बुधवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतली. ३५ नगरसेवकांचा गट तयार करून त्याच्या नेतेपदाची जबाबदारी जगदाळे यांच्यावर सोपवली आहे. (प्रतिनिधी)मुंब्य्राला प्रतिनिधित्व६ मार्चला होणाऱ्या महापौराच्या निवडणुकीत पक्ष मुंब्य्राला प्रतिनिधित्व देणार आहे. जगदाळे यांची गटनेतेपदी वर्णी लागल्याने आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.