शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इस्राईलमध्येही आता मराठीचा जागर

By admin | Updated: February 16, 2016 01:40 IST

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा विदेशात व्हावा, या उद्देशाने राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून सोमवारी इस्राईलमधील

पुणे : मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा विदेशात व्हावा, या उद्देशाने राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून सोमवारी इस्राईलमधील तेल-अवीव या विद्यापीठाशी मराठी भाषा शिकविण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. तेल अवीव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. रानान रैन, इस्राईलचे वाणिज्य दूत डेव्हिड अकोव्ह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर आदी मान्यवर उपस्थित होते.तेल-अवीव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यामधील झालेल्या सामंजस्य कराराची प्रमुख वैशिष्ट्ये तावडे यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, की अनिवासी भारतीय तसेच भारताबाहेर स्थायिक झालेले भारतीय वंशाच्या लोकांशी सांस्कृतिक वीण घट्ट करून त्यांचा उपयोग व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, कला इ.द्वारे परराष्ट्रसंबंध मजबूत करण्याकडे केंद्रातील मोदी सरकारचा कल आहे. त्याला अनुसरूनच देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी भाषिक लोकांच्यात महाराष्ट्राची भाषा, कला, संस्कृती जिवंत राहावी, यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक तसेच मराठी भाषा विभाग आग्रही आहे. इस्राईलच्या मातीत जन्मलेल्या या लोकांच्या पुढच्या पिढ्या मातृभाषा म्हणून हिब्रू बोलतात. इस्रायली विद्यापीठांत संस्कृत, हिंदी तसेच मल्याळम् भाषा शिकण्याची सोय असली तरी मराठी शिकण्याची सोय आजवर उपलब्ध नाही. त्यामुळे देश-विदेशात मराठी भाषेचा प्रचार करणे हे राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक असल्यामुळे संस्थेने मुंबई विद्यापीठ आणि तेल-अवीव विद्यापीठासह इस्राईलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर १ महिन्याचा मराठी भाषेचा अभ्यास वर्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेचा हा अभ्यासक्रम जून २०१६ पासून इस्राईलमध्ये सुरू करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य देशांतील ज्या शहरांमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे, तेथे अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)