शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जे. डेच्या पत्नीने न्यायालयात दिली साक्ष

By admin | Updated: November 8, 2016 05:01 IST

ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी शुभा डे यांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयात साक्ष दिली. डे यांची हत्या होण्यापूर्वी या खटल्यातील आरोपी विनोद

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी शुभा डे यांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयात साक्ष दिली. डे यांची हत्या होण्यापूर्वी या खटल्यातील आरोपी विनोद चेंबुर डे यांना कॉल करायचा. तर सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल महाबोले यांनी डे यांना धमकावल्याचेही शुभा यांनी विशेष न्यायालयाला सांगितले.पत्रकार अकेला याचे समर्थन करणारा लेख डे यांनी लिहील्याने सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल महाबोले यांंनी डे यांना धमकावले होते. भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत महाबोले यांनी डे यांना धमकी दिली होती, अशी साक्ष शुभा डे यांनी न्यायालयात दिली.‘२८ एप्रिल ते ५ मे २०११ या कालावधीत डे युरोप ट्रिपला गेले होते. या ट्रिपदरम्यान माझ्याशी संपर्क साधता यावा, यासाठी डे यांनी आंतरराष्ट्रीय सिम घेतले होते. लंडन, पॅरिस, जर्मनी आणि हॉलंड इत्यादी ठिकाणे ते फिरले. ट्रिपवरून घरी आल्यावर ते मला नेहमीप्रमाणेच वाटले. मात्र ३० मे रोजी माझ्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आक्सा बीचला गेलो होतो, तेव्हा डे तणावात वावरत असल्याचे मला वाटले,’ अशी साक्ष शुभा यांनी दिली.मृत्यूच्या दिवशी सकाळीच डे त्यांच्या आईला भेटायला घाटकोपरला गेले. त्यानंतर ते घरी परत आलेच नाही. डे यांच्याच मित्राने त्यांची हत्या केल्याचे समजल्यावर शुभा यांनी डे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्या रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच डे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ११ जून २०११ रोजी डे यांना त्यांच्या राहत्या घराच्या बाहेरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सतीश कालीया, अभिजीत शिंदे, अरुण ढाके, सचिन गायकवाड, अलि वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश आगवणे, विनोद असरानी उर्फ विनोद चेंबुर, पॉल्सन जोसेफ आणि दीपक सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र तर पत्रकार जिग्ना वोरा हिच्यावर पुरवणी आरोपपत्र दाखल केले. छोटा राजनला डे यांची हत्याकरण्यासाठी चिथवल्याचा आरोप वोरावर ठेवण्यात आला आहे. तर ३१ आॅगस्ट रोजी विशेष न्यायालयाने छोटा राजनवरील आरोप निश्चित केले. (प्रतिनिधी)