शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जे. जे.तील संपामागे षड्यंत्र!

By admin | Updated: April 6, 2016 05:02 IST

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचे तीव्र पडसाद मंगळवारी विधान परिषदेत उमटले

मुंबई : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचे तीव्र पडसाद मंगळवारी विधान परिषदेत उमटले. या संपामागे फार मोठे षडयंत्र असून, केवळ लहाने यांना अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या संपामागे सत्ताधारी पक्षातीलच एका मंत्र्यांची फूस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. यावर उपसभापती वसंत डावखरे यांनी लहाने यांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा करावी आणि संप तातडीने मिटविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे निर्देश सरकारला दिले. हा संप सुुरू होण्यामागे काहीतरी षड्यंत्र आहे. लहाने यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लहाने यांच्या काळात जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ५ लाखांवरून ९ लाखांवर गेली, तर शस्त्रक्रियांची संख्या १९ लाखांवरून ४० लाखांवर गेली. देशभरातील सरकारी रुग्णालयांच्या क्रमवारीतही जे. जे. रुग्णालय १९ क्रमांकावरून ५व्या क्रमांकावर आले आहे. डॉ. लहानेंच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात हे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. त्यांच्या या मुद्द्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. स्थगन प्रस्ताव नाकारला असला, तरी मंत्री महोदयांना उत्तर देण्याचा आग्रह धरल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भूमिका मांडली. ‘डॉ. लहानेंच्या बाबतीत माझ्याही भावना इतर सदस्यांप्रमाणेच आहेत. या प्रकरणी मार्डच्या सदस्यांशी चर्चा करू आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची शहानिशा करण्यात येईल. डॉ. लहानेंच्या विरोधात दरवर्षी येणाऱ्या तक्रारींची शहानिशा, चौकशी करू म्हणजे एकदाचे दूध का दूध आणि पानी का पानी होईल,’ असे तावडे म्हणाले. तावडे यांच्या उत्तरावर विरोधकांनी हरकत घेतली. लहानेंची चौकशी करण्यासारखा त्यांनी कोणता गुन्हा केला आहे, असा सवाल विरोधकांनी केला, तर चौकशी हा शब्द न वापरता या प्रकरणी माहिती घेण्यात येईल, असे म्हणण्याचा आग्रह सुनील तटकरे यांनी धरला. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही ही चौकशी करण्याआधी हा संप तातडीने मिटवा आणि रुग्णांचे हाल थांबवा व त्या दृष्टीने कारवाई करा, अशी मागणी केली.