शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण नव्हे ‘ते’ तर प्रेम प्रकरण

By admin | Updated: July 2, 2016 02:38 IST

सोशल मीडियाचा गैरवापर डोक्याला नाहक ताप देणारा कसा ठरू शकतो, याची प्रचिती नुकतीच मालाड पोलिसांना आली.

मुंबई : सोशल मीडियाचा गैरवापर डोक्याला नाहक ताप देणारा कसा ठरू शकतो, याची प्रचिती नुकतीच मालाड पोलिसांना आली. कोणतेही तथ्य न तपासता तरुणीचे अपहरण झाल्याचे सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. मात्र या संपूर्ण प्रकरणात तपासाअंती काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले. तथापि, यामुळे व्हिडीओत असलेल्या जोडप्याला आणि मालाड पोलिसांना या प्रकरणी प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.गेले आठ दिवस सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओत एका तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवून नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ मालाड पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी या प्रकरणी तातडीने कसून चौकशी सुरू केली. तीन दिवसांनंतर व्हिडीओतील कार पोलिसांनी शोधून काढली. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या एका मुलाची ती कार होती. व्हिडीओतील ती मुलगी ही त्याची प्रेयसी असून तिचे अपहरण झालेले नसल्याचे उघड झाले. मात्र मोबाइलमध्ये कुणी तरी शूट करून हा व्हिडीओ अपहरणाचा व्हिडीओ भासवून व्हायरल करण्यात आला. खरे म्हणजे एखाद्या जागरूक नागरिकाने व्हिडीओ व्हायरल न करता तो आधी पोलिसांकडे सोपवला असता. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन खातरजमा केली असती. पण सोशल मीडियामुळे या जोडप्यासह पोलिसांचीही तीन दिवस झोप उडाली होती. २२ जून रोजी हा व्हिडीओ व्हायरल होताच, मालाड पोलिसांनी वेळ न दवडता ‘घटना अहवाल’ तयार केला. चौकशीत संबंधित मुलीशी मैत्री असल्याचे समोर आले. भांडणाच्या रागात ती मुलगी गाडीत बसण्यास नकार देत होती आणि हेच सर्व एका स्थानिकाने रेकॉर्ड केले. या प्रकरणी संबंधित मुलीनेदेखील जबाब देत हे आमचे खासगी प्रकरण असल्याचे म्हटले आहे. ही घटना जेथे घडली त्या ठिकाणी वर्दळ होती. त्यामुळे निदान अशा ठिकाणी तरी अपहरण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर महाडिक यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>मालाड पोलिसांनी तयार केला ‘घटना अहवाल’२२ जून रोजी हा व्हिडीओ व्हायरल होताच, मालाड पोलिसांनी वेळ न दवडता ‘घटना अहवाल’ तयार केला. तीन दिवस कसून शोध घेत मालाड पोलिसांच्या टीमने संबंधित गाडी शोधून काढत त्या मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत संबंधित मुलीशी मैत्री असल्याचे समोर आले. काहीशा कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते, त्याच रागात ती मुलगी गाडीत बसण्यास नकार देत होती आणि हेच सर्व एका स्थानिकाने रेकॉर्ड केले. या प्रकरणी संबंधित मुलीनेदेखील जबाब देत हे आमचे खासगी प्रकरण असल्याचे म्हटले आहे.