शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

हे गजवदन...संगीताच्या विविध रंगांना एकत्र आणणारे गीत रसिकांच्या भेटीला

By admin | Updated: August 18, 2016 17:11 IST

९१ मान्यवरांना बोलाच्या एकाच धाग्यात सुंदरपणे गुंफत, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी हे गजवदन या व्हिडिओ गीताची अभिनव कंठमालिका रसिकांसमोर पेश केली आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 18 : गायक, वादक, संगीतकार, रेकॉर्डिस्ट अशा संगीत क्षेत्रातील तब्बल ९१ मान्यवरांना बोलाच्या एकाच धाग्यात सुंदरपणे गुंफत, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी  हे गजवदन या व्हिडिओ गीताची अभिनव कंठमालिका रसिकांसमोर पेश केली आहे. कलाकारांच्या उपस्थितीत गुरूवारी या गीताचे अनावरण झाले. आनंद आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या लाडक्या गणपतीबाप्पाचे सुखकर्ता दु:खकर्ता हे आरतीचे बोल आणि आरती प्रभूंनी १९७० च्या दशकात ह्यअजब न्याय वर्तुळाचाह्ण या नाटकासाठी लिहिलेल्या नांदीच्या ओळी यांच्या मिलाफातून सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली रचना म्हणजे ह्यहे गजवदन वक्रतुंड महाकाय हे व्हिडिओ गीत. ते यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर त्याला अल्पावधीतच अनेक लाईक्स मिळण्यास सुरूवात झाली असून, मराठीमध्ये झालेल्या या पहिल्याच प्रयोगावर सांगीतिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आजवर संगीतकार सलील कुलकर्णी यांनी बालगीतांपासून प्रेमगीतापर्यंत आणि चित्रपटगीतांपासून अभंगापर्यंत विविध प्रकारच्या रचना रसिकांसमोर समर्थपणे सादर केल्या आहेत. आता यापुढचे पाऊल म्हणजे ही संगीताच्या विविध रंगांना एकत्र आणणारी रचना आणि त्याचे चित्रपटाच्या स्तरावर केले गेलेले चित्रीकरण याद्वारे केलेला एक अभिनव प्रयोग. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सादर झालेल्या या व्हिडिओ गीताच्या रूपातून एका मांगल्यदायी वातावरण निर्मितीस आरंभ झाला आहे.

यात पिआनो, गिटार,सतार, सरोद सुद्धा आहे... कथ्थक नृत्यासाठी म्हटली जाणारी पढंत ही ऐकायला मिळणार आहे. पाश्चात्य ड्रम्सबरोबर पखवाज मृदंगमचा ठेकाही अनुभवता येणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून जुन्या-नव्या सांगीतिक परंपरेच्या मिलाफाचे दर्शनही घडणार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या स्वरापासून सुरु होणा-या या रचनेत आपल्याला शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, आनंद भाटे, राहुल देशपांडे, सावनी शेंडे, महेश काळे, मंजुषा पाटील, अनुराधा कुबेर ही मंडळी तर भावसंगीत, चित्रपटसंगीतातील अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, वैशाली सामंत तसेच झी सा रे ग मा चे विजेते गायक, लिटल चॅम्प्स तसेच गायिका अभिनेत्री केतकी माटेगांवकर, कवी संदीप खरे, विभावरी आपटे, मधुरा दातार, हृषीकेश रानडे हे भेटणार आहेत.

गायकांप्रमाणेच, संगीतकार कौशल इनामदार, मिलिंद इंगळे, निलेश मोहरीर, मिथिलेश पाटणकर, मिलिंद जोशी ह्यांनी सुद्धा गाण्याला आपला स्वर दिला आहे. बालगायकांचा सुद्धा व्हिडिओमध्ये या समावेश आहे. आजच्या पिढीच्या गायिका आनंदी जोशी, सावनी रविंद्र यांचाही सहभाग आहे आणि ज्यांच्याशिवाय कोणताही गाणं घडूच शकत नाही अशी वादक मंडळीसुद्धा या गाण्यात गायन सादर करताना दिसणार आहे. महाराष्ट्रातील काही नामवंत रेकॉर्डिस्ट प्रमोद चांदोरकर, विजय दयाळ, नितीन जोशी, अवधूत वाडकर इ. उत्कृष्ट साऊंड इंजिनिअर्स चा गायनातील सहभाग ही कोणत्याही गाण्यात प्रथमच घडलेली गोष्ट आहे. मराठी संगीत क्षेत्रातील एकूण 91 मंडळी या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहेत. मोहित भिशीकर हे व्हिडिओचे निर्माते असून, समीर जोशी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संपादन साहिल तांडेल यांचे आहे. हा नुसता व्हिडिओ नसून, हे एक मैत्रीचे प्रोजेक्ट आहे. जुन्या आणि नवीन कलाकारांचा मिलाफ यात पहायला मिळेल. व्यावसायिक हेतूनेही एकही कलाकार सहभागी झालेला नाही. मुंबई आणि पुण्यात कलाकार एकत्रितरित्या उपलब्ध झाले आणि हा मणिकांचन योग जुळून आला. हे गाणे चार मिनिटांचे असून, यूट्यूबवर टाकल्यानंतर क्षणातच लाईक्स मिळण्यास सुरूवात झाली, याचा मनापासून आनंद आहे. याचा आॅडिओ मिळेल का अशी मागणी आता होऊ लागली आहे, लवकरच ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल- डॉ. सलील कुलकर्णी, संगीतकार कसबा गणपतीमध्ये डॉ. सलील कुलकर्णी यांचा नेहमी सहभाग असतो. चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या मानाच्या पहिल्या गणपतीला आणताना पालखीला खांदा देण्याची विनंती सलील यांनी केली होती. दोन वर्षांपूर्वी ही पालखी खांद्यावर उचलण्याचा मान त्यांना मिळाला. गणपतीला उचलून  मोरया मोरया करताना अंगात जे व्हायब्रेशन येते, तसाच काहीसा अनुभव हा व्हिडिओ पाहून आला- आशुतोष वैद्य, कसबा गणपती