शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

आता ‘कौशल्य’पूर्ण रंगात रंगणार आयटीआयच्या इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

ग्रीन मिशन : सबलीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत

सीमा महांगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील आयटीआयच्या इमारतींच्या भिंती लवकरच ‘कौशल्य बलम’ या कौशल्य विकास विभागाच्या बोधचिन्हाच्या रंगसंगतीप्रमाणे रंगलेल्या दिसणार आहेत. हरित औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहिमेच्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून राज्यातील आयटीआयच्या तांत्रिक शाळा, इमारती, कार्यालये यांच्यासाठी एकच रंगप्रणाली ठरविली आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तांत्रिक शाळा, कार्यालयांच्या इमारती यांमध्ये हरित औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहीम राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व आयटीआय संस्था आणि त्यांच्या कार्यालयीन इमारतींत पर्यावरणपूरक उपक्रम, सौरऊर्जेवर आधारित कार्यक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. इमारतींच्या कमानीच्या प्रवेशद्वाराची रचना ही त्यावर विभागाचे कौशल्य बलम हे बोधचिन्ह ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने करावी, अशा सूचना आहेत. इमारतींत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवायचे आहेत. ग्रीन आयटीआय मिशनचा हा महत्त्वपूर्ण भाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयटीआय संस्थांना या मोहिमेसाठी फेब्रुवारी २०२० हा महिना देण्यात आला असून या दरम्यान संस्थांचे, इमारतींचे, कार्यालयांचे परिरक्षण, दुरुस्ती करावी लागेल. वेळोवेळी इमारत दुरुस्ती, सुरक्षेचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा, अशा सूचनाही विभागाने केल्या आहेत.ग्रीन आयटीआय संकल्पनेसाठी याआधीच कौशल्य विकास विभागामार्फत केआरए निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्या पूर्तता, अंलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत आपण घेत आहोत. विद्यार्थ्यांना बाहेरून अनुभव मिळण्यापेक्षा संस्थेतच अनुभव मिळेल आणि केआरएही पूर्ण होतील हा यामागील उद्देश आहे.- सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव,कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य५विद्यार्थ्यांना मिळणार कामाचे प्रात्यक्षिक शिक्षणशासकीय औद्योगिक संस्थांनी आयटीआय इमारती, संस्था, कार्यालयांमध्ये देखभाल करताना स्वत:च्याच मनुष्यबळाचा वापर करायचा आहे. वसतिगृह देखभालीबाबतही आवश्यक कार्यवाहीचे निर्देश विभागाने दिले. कौशल्य विकास विभागाच्या या ग्रीन मिशनमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचाच वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांना संस्थेअंतर्गतच प्रशिक्षण मिळावे यासाठी संस्थांमधील नादुरुस्त खिडक्या, विद्युत यंत्रणा इत्यादीची किरकोळ दुरुस्ती संस्थेतील प्रशिक्षणार्थींकडून करून घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.