शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

शहरातील माणूस संवेदनशीलता हरवून बसला म्हणणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 03:18 IST

वर्षानुवर्षे गावासाठी काम करणाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला सत्कार म्हणजे सतत गावासाठी काम करणाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानणेच आहे.

रोहा : वर्षानुवर्षे गावासाठी काम करणाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला सत्कार म्हणजे सतत गावासाठी काम करणाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानणेच आहे. सन्मानासाठी ती व्यक्तीच कारणीभूत असते असे नाही तर तो प्रातिनिधिक स्वरूपात असतो. नामच्या कामात गावागावातून कुठलीही अपेक्षा न ठेवता, सन्मानाची अपेक्षा न ठेवता काम करणारे खरे हीरो आहेत. सुमारे ५८० कि.मी. खोलीकरण, लांबीकरण व रुंदीकरणाचे काम केवळ दहा कोटीच्या लोकांमधून आलेल्या पैशातून झाले. शहरातील लोकांनी गावासाठी पैसे दिलेले आहेत म्हणूनच शहरातील सगळ्या धकाधकीत माणूस संवेदना हरवून बसलाय असे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी रोहा येथे केले.रोहा शहर राष्ट्रवादीच्या वतीने रोहा अष्टमीमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांना रोहा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे होते. मी अजूनही आईकडे राहतो असं सांगत तिच्या बोलण्यातलं मार्दव जास्त आवडतं. सतत समुद्र लहानपणी समोर दिसला, त्याची गाज, विशालपण, अजस्त्रपण पाहिल्याने कधीही मनात छोटे विचार आले नाहीत, त्यामुळे प्रतिकूल स्थितीतही केवळ अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याने टिकू शकलो. अमर्यादित काम करायला गेलं की आपण ओव्हर एक्सपोज होतो, समाजासाठी केलेले काम एक्सपोज होणे गरजेचे असते तेवढे आपण फुलत जातो. कितीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयपुरस्कार मिळाले तरीही आज नामच्या माध्यमातून काम करताना जे समाधान मिळतेय ते सर्वात जास्त आहे, असे नाना पाटेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या वतीने नाना पाटेकर, आमदार सुनील तटकरे यांना सन्मानपत्र दिले. निखील दाते यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. डॉ. चिंतामणराव देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्र माला दीड हजार रोहेकर उपस्थित होते. (वार्ताहर)>समाजात संवेदना निर्माण के लीआमदार सुनील तटकरे यांनी ज्या गावानं मला घडवलं त्या गावाला गाव म्हणून घडवणाऱ्यांचा सन्मान करण्याची ही संधी मिळाल्याचे सांगून नाम संस्थेच्या माध्यमातून समाजाबरोबरच सरकारच्या मनातही संवेदना निर्माण करण्याचे काम नाना पाटेकरांनी केल्याचे सांगितले.नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत साळुंखे यांनी नाम संस्थेची महती सांगणारी कविता सादर केली.>पुरस्कार विजेतेकार्यक्र मात किशोर सोमण, गजानन मळेकर, डॉ. नंदकुमार पेंडसे, रवींद्र ढवळे, जाफरखान देशमुख, अहमद नुराजी, कलाब जनाब, अस्मिता सुर्वे, कुमार देशपांडे, मानसी चाफेकर, यशोदा धाटावकर, शैलेश साळुंखे, रमेश गुडेकर, बबन सोलंकी, रजनीकांत शहा, गिंडी काका, रमेश साळवी यांना रोहा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.