शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीचे अस्तित्व संपवणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 21:22 IST

राज्य शासनाने बालचित्रवाणीपाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’चे अस्तित्व संपवण्याचा घाट घातला आहे.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 30- राज्य शासनाने बालचित्रवाणीपाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’चे अस्तित्व संपवण्याचा घाट घातला आहे. गेल्या 50 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणा-या बालभारतीचे अधिकार अचानकपणे कमी करणे चूकीचे असून पुढील काळात त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते,असे मत बालभारतीच्या माजी संचालकांकडून व्यक्त केले जात आहे.

शासनाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे नामकरण ‘विद्या प्राधिकरण’असे केले असून बालभारतीचे पुस्तक निर्मितीचे काम काढून विद्या प्राधिकरणाकडे दिले आहे. त्यामुळे 50 वर्षांपासून दर्जेदारपाठ्यपुस्तक निर्मिती करणारी बालभारती संस्था केवळ पुस्तक छपाई करणारा छापखाना म्हणूनच काम पाहणार आहे. बालभारतीमधील कर्मचा-यांची नियुक्ती विद्या प्राधिकरणामध्ये केल्याने आणि कामाचा भार कमी होणार असल्याने कालांतराणे बालभारतीचे अस्तिवच संपणार आहे. बालभारतीला अभ्यासक्रम निर्मितीसाठी स्वयत्तता होती. पहिली पासून दहावी-बारावीपर्यंतचे अभ्यासक्रम व पाठ्य पुस्तक निर्मितीचे काम एकाच संस्थेकडे आले तर त्यातून अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बालभारतीचे अधिकार कमी करू नयेत,अशी भूमिका बालभारतीचे माजी संचालक डॉ.वसंत काळपांडे ,एम.आर. कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
काळपांडे म्हणाले, बालभारती 1967 पासून स्वतत्त संस्था म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.  बालभारती 50 वर्ष पूर्ण करत असून याच वर्षी संस्थेचे अधिकार कमी करणे दूर्दैवाचे आहे.अनुभवी कर्मचारी व तज्ज्ञ व्यक्तींमुळे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची पुस्तके चांगल्या पध्दतीने काढली जात होती. बालभारतीकडून नुकतेच प्रसिध्द केलेले इयत्ता सहावीचे पुस्तकही चांगले असून त्याचे कौतुक होत आहे. एकूणच बालभारती चांगले काम करत असल्याने आणि संस्थेतकडे काम करण्याची क्षमता असल्याने नववीच्या पुस्तकाचे कामही देण्यात आले होते. बालभारती आपले 50 वर्षेपूर्ण करत असल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिक्षण मंत्र्यांनी ही संस्था आपले शताब्दी वर्ष साजरे करील,असे आपल्या मनोगतात सांगितले होते.मात्र,अधिकार कमी करून बालभारतीकडे पुस्तकांची छपाई करणारा कारखाना म्हणून काम सोपवणे चूकीचे आहे.
एम.आर.कदम म्हणाले, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ ही संस्था ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली तो उद्देश मागे पडत आहे. पुस्तक निर्मितीसाठी स्वायत्तता असणे गरजेचे आहे. दुस-या संस्थेकडे स्वायत्तता असणार नाही.त्यामुळे दर्जेदार पुस्कनिर्मिती व प्रश्नपत्रिका तयार होतील का? याबाबत साशंकता आहे.