शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला उमेदवार मिळू नयेत हे दुर्दैव

By admin | Updated: January 3, 2017 06:33 IST

ज्या भाजपाचा जन्म १९५२ मध्ये झाला, त्यांना निवडणूक लढविण्यासाठी अजूनही उमेदवार मिळू नये, हे दुर्दैैव आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले.

पुणे : ज्या भाजपाचा जन्म १९५२ मध्ये झाला, त्यांना निवडणूक लढविण्यासाठी अजूनही उमेदवार मिळू नये, हे दुर्दैैव आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले. आता पालिका निवडणुकीसाठी मनसेचे लोक पळवित आहेत, मात्र माझ्याकडे खूप लोक आहेत. भाजपाच्या लोकांना केवळ घोषणा करायची हौस आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी भाजपाच्या इतर पक्षातून उमेदवार आयात करण्यावर जोरदार टीका केली. भांडारकर रस्त्यावरील मनसेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे उपस्थित होते. नोटाबंदी, राम मंदिर, शिवस्मारक आदी मुद्द्यांवर ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान भाषण देत असताना त्यांच्या देहबोलीवरून ते जाणवत होते. भाजपाच्या नेत्यांना लोकप्रिय घोषणा करण्याची हौस आहे. राम मंदिर बांधण्याची घोषणा करून त्यांनी अनेक खासदार निवडून आणले, मात्र पूर्ण बहुमत असताना त्यांना अजून राम मंदिर उभारता आले नाही अन् मुंबईतल्या एका स्टेशनला त्यांनी राम मंदिर हे नाव दिले.’’राज्य सरकार शिवस्मारक उभारणी, मेट्रो करणार अशा अनेक घोषणा करीत आहे. मात्र त्यासाठी लागणारा पैसा ते कुठून आणणार आहे, हे कुणीच विचारत नाही. शिवस्मारकात उभारला जाणारा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल, असा दावा भाजपावाले करीत आहेत, मात्र त्यासाठी योग्य तो अभ्यास त्यांनी केलेला नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. जात, धर्म, भाषा आदी मुद्द्यांवर मते मागू नयेत, असे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्याबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या मोबाइल कंपन्यांनी सेवा देताना मराठी भाषेचा वापर करावा यासाठी आंदोलन केले तर त्यात गैर काय.’’