शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोवर, रुबेलाची सक्ती नाही, पण लस घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:56 IST

आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; लस घेतल्यानंतर भोवळ आल्यास घाबरून जाऊ नका

मुंबई : गोवर, रुबेला लसीची सक्ती नसली तरी ती घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही बाधा होत नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले.

लसीकरणाचा कार्यक्रम राज्याच्या शाळांत राबविला जात आहे. ही लस दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याने पालक घाबरले. त्यावर डॉ. सावंत म्हणाले की, १४९ देशांत लसीकरणाची मोहीम राबविली गेली आहे. आपल्या २० राज्यांत लसीकरण झाले आहे. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने ही बनवली असून ती सुरक्षित आहे. पोलिओच्या डोसमुळे काही मुलांना जसा ताप येतो, तसे या लसीमुळे काही मुलांना तात्पुरती भोवळ येते, पण त्यामुळे घाबरू नये, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

का आवश्यक?गोवर, रुबेला हे आजार सात ते आठ दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतरही आजारी मुलास न्युमोनिया, मेंदुज्वर, अंधत्व तथा मेंदूचा आजार होण्याची शक्यता असते. शिवाय, गर्भपात होणे किंवा मुलास जन्मत:च अपंगत्व येणे वा ते गतिमंद, कुपोषित असणे हे प्रकार होतात. त्यामुळेच लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.गोंदिया, बुलडाण्यात काही विद्यार्थ्यांना बाधागोवर-रुबेला लस दिल्यानंतर गोंदिया येथील स्टार इंटरनॅशनल शाळेतील ६ विद्यार्थ्यांना चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. तर बुलडाणा जिल्ह्यात ४ दिवसांत २१ जणांना किरकोळ रिअ‍ॅक्शन आली, तरी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.