शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आयटीचे जाळे राज्यभर विणावे

By admin | Updated: April 6, 2016 05:00 IST

आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे,

नवी मुंबई : आयटी कंपन्यांनी केवळ ठरावीक शहरांपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर महत्त्वाच्या भागांतही जाळे विणण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. राज्यात तरुणांची संख्या अधिक असून, आयटी क्षेत्रात त्यांच्या बुद्धीचा वापर करून घेतल्यास महाराष्ट्राची छाप जगात पडेल, असा विश्वास त्यांनी ऐरोलीत व्यक्त केला.येथील खासगी नॉलेज पार्कचे उद्घाटन व दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाला. याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्यासह कंपनीचे संचालक पॉल हर्मलीन व इतर मान्यवर उपस्थित होते. आयटी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात आयटी धोरण अधिक सक्षम केले जात आहे. नव्याने राबवल्या जाणाऱ्या या धोरणात आयटी कंपन्यांना अधिकाधिक सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथे व्यक्त केली. सध्या मुंबई, नवी मुंबई अशा ठरावीक शहरांमध्येच आयटी कंपन्या आपला जम बसवत आहेत. यामुळे नोकरीच्या शोधात असलेले तरुण शहरी भागांकडे धाव घेत आहेत. शिवाय काही ठरावीक शहरांचीच विशेष ओळख तयार होत आहे. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न करावेत. त्याकरिता नागपूर व सांगलीसारख्या शहरांचाही विचार व्हावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचवले. लोकसंख्येत तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. हे तरुण बुद्धीच्या बळावर राज्याला तंत्रज्ञानात पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)