शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

..हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही - राज ठाकरेंनी ठणकावले

By admin | Updated: September 10, 2015 18:12 IST

महाराष्ट्रात कोणी काय खावे हे जैन धर्मियांनी ठरवू नये, हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही असं शब्दात राज ठाकरे यांनी ठणकावले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० - महाराष्ट्रात कोणी काय खावे हे जैन धर्मियांनी ठरवू नये, हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही असं शब्दात राज ठाकरे यांनी ठणकावले आहे. पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर बंदी असेल तर गणपती, श्रावण व नवरात्रौत्सव दरम्यानही मांसविक्रीवर बंदी घालणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

मांसविक्री बंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रंगशारदा येथे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मांसविक्री बंदीवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मांसविक्री बंद होणार नाही, २ - ४ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी का घालायची, विक्रेत्यांनी अशी कोणतीही बंदी पाळू नये, या सर्व विक्रेत्यांना मनसे संरक्षण देईल अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. ग लोकांना चांगले रस्ते, सुरक्षा, पाणी, शिक्षण, रोजगार हवा आहे, पण दुर्दैवाने सत्ताधारी भाजपाला या मुद्द्यांपेक्षा भलत्याच मुद्द्यांमध्ये रस आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली. या वादाला जैन विरुद्ध हिंदू असा रंग देण्याचा प्रयत्न आहे, भाजपानेच हे सर्व पेरलंय व यातून भाजपालाच राजकीय लाभ मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.  नाशिक महापालिका क्षेत्रात मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आयआरबी हा राजकीय पक्षांना फंड पुरवाणारी कंपनी आहे असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. सरकारविरोधी बोलण हा देशद्रोह ठरुच शकत नाही, लोकशाहीत अशा गोष्टी चालणारही नाहीत, प्रत्येक गोष्टीवर निर्बंध घातले जात आहेत, देशात व राज्यात मोगलाई आली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  भाजपा हा भारतीय जंत पक्ष आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. राकेश मारियांसारख्या तडफदार अधिका-याला तडकाफडकी हटवण्याची गरज नव्हती असेही त्यांनी नमूद केले.