शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर

By admin | Updated: July 8, 2017 03:51 IST

मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी बेकायदेशीर असून, त्यांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये केलेली कृतीदेखील कायदेशीर नसल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.शिर्के यांच्याविरुद्ध बेकायदेशीर पाटी लावल्याबद्दल छावणी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मालेगाव येथे काही व्यक्ती गार्इंची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून गोवंश संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक व क्लीनर यांना मारहाण केली होती. त्यानंतर, गोवंश संरक्षण समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.संगमेश्वर भागात नंतर मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला झाला. त्यावरून छावणी पोलीस ठाण्यात तन्वीर खान खलीलखान यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. प्रमुख संशयित तन्वीर खान याचा मालेगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता़मात्र, त्याच वेळी न्यायालयाने शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी कायदेशीर आहे किंवा कसे, याबाबत सरकारने शहानिशा करावी. पाटी लावणे बेकायदेशीर असेल, तर पोलिसांनी त्यावर काय कार्यवाही केली, याचा खुलासा करावा, अशी सूचना सरकारला केली होती. त्यानुसार, सरकारने हे स्पष्टीकरण न्यायालयात केले़बेकायदेशीर पाटीबाबत गुन्हा दाखलअलीकडेच न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे तन्वीर खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी झाली. सरकारतर्फे वाहनावर ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी शिर्के लावू शकत नाहीत. त्यांचे कृत्य बेकायदेशीर असून, शिर्के हे प्राणी कल्याण अधिकारी नाहीत, शासनाच्या प्राणी कल्याण समितीचे ते सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनी गोवंश रक्षक म्हणवून घेणेही चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. शिर्के यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान् वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले.बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई ?मालेगाव येथील घटनेत न्यायालयाने खासगी वाहनांवर लावण्यात आलेल्या पाटीबद्दल सरकारला जाब विचारल्याने, पोलिसांना यापुढे बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई करावी लागू शकते.