शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

राजकीय तुरुंगवास ते गुंतता हृदय हे !

By admin | Updated: July 7, 2016 06:14 IST

स्मृती इराणींना वस्त्रोद्योगात ढकलत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा खांद्यावर सोपविण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर या खाशा पुणेरी व्यक्तिमत्त्वावर अवघ्या संघपरिवाराचा

- जावडेकरांच्या मित्रांची स्मृतिचित्रे

मुंबई : स्मृती इराणींना वस्त्रोद्योगात ढकलत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा खांद्यावर सोपविण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर या खाशा पुणेरी व्यक्तिमत्त्वावर अवघ्या संघपरिवाराचा विशेष लोभ आहे. तारुण्यापासूनच राजकारण-समाजकारणात हिरीरीने भाग घेणाऱ्या जावडेकर यांचा मित्रपरिवारही मोठा आहे आणि विशेष म्हणजे ते अजूनही त्यांच्या ‘मित्रमेळ्या’त तितक्यात समरसतेने रमतात. त्यांचे महाविद्यालयीन सहअध्यायी असलेल्या अजित कारखानीस यांनी देशाच्या महत्त्वाच्या पदावर स्थानापन्न झाल्यानंतर आपल्या लाडक्या मित्राच्या आठवणींना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला.महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असणाऱ्या जावडेकरांनी बी.कॉमपर्यंतचे शिक्षण संपवून १९७१च्या सुमारास बँक आॅफ महाराष्ट्रात नोकरी सुरू केली. त्यानंतर चारच वर्षांनी १९७५ साली पेटलेल्या आणिबाणीविरोधातील आंदोलनात त्यांनी उडी घेतली. त्यात त्यांना ७५ ते ७८ या काळात तुरुंगवास सोसावा लागला होता. येरवड्यातील तुरुंगवासाच्या काळात त्यांचा हृदयविकाराचा त्रास उफाळून आला. हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना तातडीने औंधच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

मनमिळावू आणि सर्वांशी सुसंवाद राखून असणाऱ्या जावडेकरांच्या प्रकृतीची चिंता त्या वेळी तुरुंगात असणाऱ्या गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांसारख्या तत्कालीन जनसंघाच्या युवानेत्यांना आणि कार्यकर्त्यांना होती. जावडेकरांची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून शस्त्रक्रियेच्या दिवशी तुरुंगात सर्वांनी संपूर्ण दिवस उपवास केला. विशेष म्हणजे तुरुंगात त्या वेळी असणाऱ्या राजकीय बंदिवानांसोबतच अन्य कुख्यात गुन्हेगारही या उपवासामध्ये सहभागी झाले होते, अशी आठवण कारखानीस यांनी सांगितली.या तुरुंगवासाच्या काळातच जावडेकरांच्या भावी राजकीय वाटचालीची बीजे खऱ्या अर्थाने रोवली गेली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा येथेच स्रेह जमला. विशेष म्हणजे अभाविपची कार्यकर्ती असणाऱ्या प्राची द्रविड यांच्याशीही त्यांचे याच काळात बंध जुळले आणि त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला, असे कारखानीस यांनी सांगितले.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जेमतेम दोन वर्षे नोकरी केली आणि १९८० पासून भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पूर्णवेळ सक्रीय राजकारणात भाग घेण्याचे ठरवले. तेव्हापासून त्यांची राजकीय घोडदौड सुरूच आहे. १९९० साली पुण्यातील पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य ते केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असा त्यांचा राजकीय आलेख सतत उंचावत गेला आहे.पत्रकार वडिलांचे संस्कारप्रकाश जावडेकर यांचे वडिल केशवराव हे अनेक वर्षे केसरी या दैनिकात उपसंपादक म्हणून कार्यरत होते. केशवराव हे हिंदुमहासभेचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या उजव्या विचारधारेचे संस्कार त्यांच्यावर बालवयातच झाले.‘झेप’ गटजावडेकर महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व आणि भाषणांमध्ये कायमच पुढाकार घेत. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या शैलीची छाप पाडत पारितोषिके जिंकल्याची आठवण त्यांचे मित्र सांगतात. महाविद्यालयीन जीवनात होणारे मित्र-मैत्रिणी कायम संपर्कात राहाव्यात यासाठी जावडेकर आणि अन्य काही तरुणांनी ‘झेप’ नावाचा गट स्थापन केला. आजही दरवर्षी २६ जानेवारीला या गटाचे सदस्य पुण्यात एकत्र जमतात. जावडेकरही या गटाच्या सदस्यांशी वैयक्तीक संपर्कात असतात. इतक्या मोठ्या पदावर बसल्यानंतरही प्रकाशचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. मित्र म्हणून तो पूर्वीसारखाच आहे, असे कारखानीस सांगतात.