शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

झाली भिर्र..भिर्र..

By admin | Updated: December 6, 2014 22:47 IST

खास गावरान ढंगातील निवेदन.. तापलेले ऊन.. आणि ओसंडून वाहणारा आनंद अशा चैतन्यपूर्ण वातावरणात हजारो बैलगाडा शौकीन आणि प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यतींचा मनमुराद आनंद लुटला.

शेलपिंपळगा : खास गावरान ढंगातील निवेदन.. तापलेले ऊन.. आणि ओसंडून वाहणारा आनंद अशा चैतन्यपूर्ण वातावरणात हजारो बैलगाडा शौकीन आणि प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यतींचा मनमुराद आनंद लुटला. साबळेवाडी (ता. खेड) येथे श्री अंबिका मातादेवीच्या उत्सवानिमित्त नवसाच्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. 
सुमारे वर्षभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठवून शर्यतींना पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखविल्याने बैलगाडा शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. बंदी उठवल्यानंतर खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे प्रथम नवसाच्या  शर्यती पार पडल्या असून, असंख्य बैलगाडा मालकांच्या बा:या घाटात जुंपण्यात आल्या. बैलगाडा शर्यतींच्या घाटाचे उद्घाटन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. 
नवसाच्या शर्यतीदरम्यान आमदार सुरेश गोरे, अनिल राक्षे, शेलपिंपळगावचे माजी उपसरपंच संजय मोहिते आदींसह अन्य पक्षांच्या पदाधिका:यांनी विशेष हजेरी लावली होती. शर्यतींमध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ देण्यात आली. शर्यती यशस्वी पार पडण्यासाठी समस्त साबळेवाडी ग्रामस्थांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 
 
‘बैलगाडा मालकांनी नियमांचे पालन करावे’
4राजगुरुनगर : बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे संचालक रामकृष्ण टाकळकर व आबा शेवाळे यांनी स्वागत केले आहे. पण या शर्यती सुरू करण्याबरोबरच बैल या प्राण्याला संबंधित राजपत्नातून वगळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
4बैलगाडा मालकांनी आता नियम व अटींचे पालन करून शर्यती घ्याव्यात म्हणजे भविष्यात त्या चालू राहतील, असे आवाहनही त्यांनी केले.