शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांची माफी मागून आयटी अभियंत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 23:10 IST

वाकड मधील आयटी अभियंत्याने सुसाईड नोट मध्ये सर्वांची माफी मागून राहत्या घरात दोरिच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

ऑनलाइन लोकमत
वाकड, दि. 24 - वाकड मधील आयटी अभियंत्याने सुसाईड नोटमध्ये सर्वांची माफी मागून राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि २४) रात्री साडे आठच्या सुमारास उघडकीस आली.
       किरण राजू भुजबळ (वय २५, रा. भुजबळ वस्ती वाकड) असे त्याचे नाव असून तो पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला होता. रिक्षा व्यावसायिक व शेतकरी राजू भुजबळ यांचा तो  एकूलता एक मुलगा गेल्या दोन-तीन महिन्यापुर्वीच त्याचे लग्न झाले होते.
          याबाबत फौजदार शरद जाधव यांनी दिलेली माहिती अशी,  सोमवारी सायंकाळी घरी किरण एकटाच होता रात्री साडे आठच्या सुमारास त्याचे मेहुणे घरी आले होते तेव्हा घराचे सर्व दरवाजे आतून बंद दिसले त्यांनी बराच वेळ आवाज देवूनही आतुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी राजू भुजबळ यांना फोन केला असता त्यांनी किरण घरीच असल्याचे सांगितले. तेव्हा शेजा-यांची मदत घेवून त्यांनी घरात प्रवेश केला असता किरणने गळफास घेतल्याचे उघड झाले.
किरणने आत्महत्येपूर्वी मला जगावस वाटत नाही, आई-वडिलांनी मला खूप शिकविले मात्र मी त्यांचे उपकार फेडू शकलो नाही, असे म्हणत आई-वडील, पत्नी यांच्यासह सर्वांची माफी मागितली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. किरणच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.