शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा मुद्दा पालिकेतही गाजला

By admin | Updated: August 4, 2016 00:51 IST

विधानसभेत सुरू असलेल्या विदर्भ आंदोलनाचे पडसाद बुधवारी महापालिकेतही उमटले.

पुणे : विधानसभेत सुरू असलेल्या विदर्भ आंदोलनाचे पडसाद बुधवारी महापालिकेतही उमटले. अखंड महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्यांचा निषेध करीत स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. तर सर्वसाधारण सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सतीश म्हस्के यांनी विदर्भवाद्यांचा निषेध करणारे कपडे घालून अभिनव आंदोलन केले. स्थायी समितीमधील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनीही तहकुबीला पाठिंबा दिला हे विशेष!सरकारमधील भाजपचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा यांचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा त्यांचे नाव न घेता स्थायी समितीच्या झालेल्या सभेत निषेध करण्यात आला. अखंड महाराष्ट्राच्या विरोधात छुपी अथवा उघड भूमिका घेणाऱ्या समाजकंटकांचा निषेध, महाराष्ट्र अखंडच राहायला हवा, या मागणीसाठी म्हणून सभा तहकूब करीत असल्याचे पत्रक समितीने जाहीर केले. समितीतील सर्व सदस्यांनी याला एकमताने मान्यता दिली, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच नगरसेवक म्हस्के निषेधाच्या घोषणा लिहिलेला गणवेश घालून सभागृहात आले. महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या केंद्र तसेच राज्य सरकार व प्रदेशाध्यक्षांचा निषेध असो असे त्यावर लिहिले होते. टोपी व काळा गंध लावून सभागृहात आलेल्या म्हस्के यांना बोलायचे होते; मात्र पाण्यावरील चर्चा सुरू असल्याने त्यांनी संधी मिळाली नाही. महापौरांनी नंतर तहकुबी सूचना मांडल्याने त्यांना काहीही बोलता आले नाही. तरीही त्यांनी पुढील सभेत या विषयावर बोलण्याची संधी द्यावी, असे महापौरांना सांगितले. (प्रतिनिधी) > उधळपट्टीला आडवळणाने मंजुरीपुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या विद्यानिकेतन शाळांमधील विद्यार्थ्यांना अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यासाठी ४ कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याच्या प्रस्तावास मनसे, काँग्रेस, भाजपने तीव्र विरोध दर्शविला. तरीही मोफत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना आमंत्रित करावे. त्या न आल्यास संबंधित संस्थेला याचे काम देण्यात यावे, अशी उपसूचना देऊन अ‍ॅबॅकस प्रशिक्षणाच्या फेरविचाराच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.अ‍ॅबॅकस प्रशिक्षणासाठी ४ कोटी खर्च करण्याच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा, असे पत्र मनसेचे किशोर शिंदे यांनी स्थायी समितीला दिले होते. त्यावर समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अ‍ॅबॅकसचे मोफत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रस्ताव जाहिरात देऊन मागविण्यात यावे, त्यासाठी दर्जेदार संस्थेचा प्रस्ताव न आल्यास या प्रशिक्षणासाठी पैसे खर्च करण्यात यावे, अशी उपसूचना या वेळी मांडण्यात आली. स्थायी समितीमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी या उपसूचनेसह या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. शिक्षण मंडळ सदस्या विनिता ताटके यांनी या विषयाला विरोध केला होता. तरीही स्थायी समितीमध्ये या विषयाला एकमताने मंजुरी देण्यात आली होती. >मोफत प्रशिक्षण?एका संस्थेने अ‍ॅबॅकसचे मोफत प्रशिक्षण देण्याची तयारी शिक्षण मंडळाकडे दर्शविली आहे. या उपसूचनेनुसार त्या संस्थेला आता अ‍ॅबॅकस प्रशिक्षणाचे काम देण्यात येणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.