शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय आयोगापुढे मांडा आरक्षणाचा मुद्दा

By admin | Updated: February 28, 2017 04:55 IST

मराठा आरक्षणासंदर्भातील अंतिम सुनावणीस सोमवारपासून सुरुवात होणार होती.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील अंतिम सुनावणीस सोमवारपासून सुरुवात होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी या याचिकांवरील सुनावणी २९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जमा केलेली माहिती मागासावर्गीय आयोगापुढे मांडायची की नाही? हा प्रश्न उच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळे याबाबत सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी २९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी राणे समितीने सादर केलेला अहवाल आणि आता नव्याने राज्य सरकारने पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सादर केलेला अहवाल मागासवर्गीय आयोगापुढे न सादर करता, थेट उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. गेली पाच वर्षे मागासवर्गीय आयोग अस्तित्वात नव्हते. मात्र, आता राज्य सरकारने ४ जानेवारी २०१७ रोजी अधिसूचना काढून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संभाजी बाबुराव म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजासंदर्भातील मिळवलेल्या माहितीत तथ्य आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी संपूर्ण अहवाल आयोगापुढे सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका बाळासाहेब सराटे व अन्य दोघांनी केली आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवरील सुनावणी होती.सुनावणीत उच्च न्यायालयानेही याचिकांमध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांवर निर्णय घेण्याइतपत आपण तज्ज्ञ नसल्याने, या बाबी आयोगाने पडताळल्या तर अधिक योग्य ठरेल, असे म्हटले.‘आयोगामध्ये तज्ज्ञांचा समावेश आहे. ते सगळ्या बाबी पडताळू शकतील. त्यामुळे या सर्व याचिकाकर्त्यांनी तेथे निवदेन करणे योग्य ठरेल. मात्र, आम्ही आता याबाबत काहीही बोलत नाही किंवा तसे निर्देशही देत नाही. यावर सगळ्यांचे एकमत झाले, तरच विचार करू,’ असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.राज्य सरकारने आयोगाला सहकार्य करण्याची हमी उच्च न्यायालयाला दिली, तर मराठा आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला. ‘जर उच्च न्यायालयाने याचिका आयोगापुढे पाठवल्या, तर त्याच दिवसापासून आरक्षणासंदर्भात केलेला कायदा लागू करण्यात येईल,’ अशी भीती याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली. त्यावर उच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना २९ मार्चपर्यंत राज्य सरकारचा अहवाल आयोगापुढे मांडायचा की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)>का सादर करायचा अहवाल?घटनेचे कलम ३४० व सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी आणि मंडळ आयोगानुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यापूर्वी संबंधित समाजासंदर्भात जमा केलेली माहिती आयोगापुढे मांडणे बंधनकारक आहे. सरकारने सादर केलेल्या माहितीत किती तथ्य आहे, याची पडताळणी व विश्लेषण करण्याचे काम आयोग करते. या नियमानुसार, राणे समितीचा आयोग व राज्य सरकारने नव्याने सादर केलेल्या अहवालाची पडताळणी व त्यातील सत्यता जाणण्यासाठी आयोगापुढे मांडणे गरजेचे असल्याचे बाळासाहेब सराटे यांनी याचिकेत म्हटले आहे. >वैधताही तपासावी लागणार आयोगापुढे अहवाल मांडला गेला, तरी हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत, ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन, राज्यातील एकूण आरक्षणाची मर्यादा ५२ टक्के एवढी वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कायद्याची वैधताही उच्च न्यायालयाला तपासावी लागणार आहे.