शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’ने अपहरण केल्याचा बनाव!

By admin | Updated: August 7, 2016 02:28 IST

चांगली नोकरी कर, तू स्वत:च्या पायावर कधी उभा राहणार, अशा घरच्यांकडून होणाऱ्या प्रश्नांनी हैराण झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने पलायन करीत मुंबई

मुंबई : चांगली नोकरी कर, तू स्वत:च्या पायावर कधी उभा राहणार, अशा घरच्यांकडून होणाऱ्या प्रश्नांनी हैराण झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने पलायन करीत मुंबई गाठली. मात्र येथेही नातेवाइकांकडून त्याबाबत विचारणा होऊ लागल्याने त्याने आपले ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी अपहरण केल्याची थाप मारीत कुटुंबीयांना घाबरवून सोडले. मात्र पोलीस तपासात त्याचा बनाव उघड झाला आणि ताडदेव पोलिसांनी त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. गुजरातमधील अनुज उपाध्याय हा २२ वर्षांचा तरुण काही काम करीत नसल्याने घरातील मंडळी त्याला सतत कामधंदा कर, चांगली नोकरी शोध, असे सांगत होती. मात्र काम करण्याची इच्छा नसलेल्या अनुजने २५ जुलैला थेट मुंबई गाठली. त्यापूर्वी त्याने चुलत भाऊ अंकितला थोडी कल्पना देऊन याबाबत घरात कोणालाही न सांगण्याची सूचना केली होती. मुंबईत तो एका नातेवाइकांकडे राहिला. मात्र त्यांनीही विचारपूस सुरू केल्याने अनुज तेथूनही बाहेर पडला. दोन दिवस भटकल्यानंतर त्याला घरची आठवण येऊ लागली. मात्र घरी गेल्यानंतर ते रागावतील, या भीतीने त्याने अंकितच्या मोबाइलवर मेसेज पाठवला. त्यात त्याने ‘आपण ‘इसीस’चे अतिरेकी असून अनुजचे अपहरण केले आहे. अंधेरी येथे डांबून ठेवलेल्या अनुजला चार दिवसांत ठार मारू’, असे नमूद केले. हा मेसेज वाचून घाबरलेल्या अंकितने घरच्यांना ही बाब सांगितली. त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. त्याची शोधमोहीम सुरू असताना अनुजने भावाला पुन्हा मेसेज करून अतिरेक्यांच्या तावडीतून माझी सुटका करून घेतली असून अंधेरीत थांबल्याचे कळविले. दरम्यान, त्याच्या नातेवाइकांनी त्याला नालासोपारा येथे येण्यास सांगितले असता तो टाळाटाळ करू लागला. दरम्यान, पोलिसांनी मोबाइलवरून ठिकाण शोधत त्याला ताडदेव येथून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)मोबाइलवरून सापडला ठावठिकाणापोलिसांनी अनुज उपाध्यायकडे चौकशी केली असता अपहरणाचे बिंग फुटले. घरच्यांच्या भीतीमुळे अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली. अनुज व त्याच्या नातेवाइकांना योग्य सूचना देत त्यांच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले.ताडदेव येथे भटकणाऱ्या अनुजला त्याच्या मोबाइल लोकेशनवरून शोध घेत पोलिसांनी ताब्यात घेतले.