शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

इस्थेर अनुह्या हत्याकांड येत्या आठवडयात आरोपपत्र ?

By admin | Updated: May 24, 2014 00:01 IST

हैद्राबादहून मुंबईला परतलेल्या इस्थेर अनुह्या या २३वर्षीय इंजिनिअर तरूणीची शारिरिक अत्याचारानंतर निघृर्णपणे हत्या करणार्‍या आरोपी चंद्रभान सानपविरोधात गुन्हे शाखा येत्या आठवडयात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता

मुंबई। दि. २३ (प्रतिनिधी) -हैद्राबादहून मुंबईला परतलेल्या इस्थेर अनुह्या या २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीची शारिरिक अत्याचारानंतर निघृर्णपणे हत्या करणार्‍या आरोपी चंद्रभान सानपविरोधात गुन्हे शाखा येत्या आठवडयात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. मुळची हैद्राबाद, विजयवाडाची रहिवासी असलेली अनुह्या मुंबईतील टीसीएस कंपनीत काम करत होती. नाताळच्या सुटीत ती गावी गेली होती. सुटी संपवून ५ जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनन्सवर उतरली. मात्र तेथून ती बेपत्ता झाली. पुढे १६ जानेवारीला पूर्वद्रुतगती मार्गावर, भांडुपेश्वर कुंडाजवळील निर्जन झाडीत तिचा कुजलेला मृतदेह आढळला. तिच्या हत्येचा गुंता सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस, राज्य रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखा धडपडत होत्या. अखेर एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील जबरीचोरी व दरोडाविरोधी पथकाने अत्यंत शिताफीने आरेापी चंद्रभानला गजाआड केले होते.टर्मिनन्सवर उतरल्यानंतर अनुह्या वेटींगरूमच्या शोधात होती. तिच्या हालचालींवरून ती शहरात नवी आहे हे स्पष्ट होत होते. तीला बघताच गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या चंद्रभानने तिला गाठले. मॅडम तुम्हाला कुठे जायचे आहे, माझ्याकडे टॅक्सी आहे, तीनशे रूपयात अंधेरीला सोडेन, असे आमीष दाखवले. त्यावर घाबरू नका, माझा फोन नंबर, नाव, गाडीचा नंबर पालकांना कळवा. विश्वास ठेवा मी तुम्हाला फसवणार नाही, अशी गळही घातली. प्रवासाचा क्षीण असल्याने अनुह्याने त्याला होकार दिला. मात्र टर्मिनन्सच्या पार्किर्ंग लॉटमध्ये पोहोचताच चंद्रभानकडे टॅक्सी नसून बाईक आहे हे अनुह्याला समजले. तीथे तीने चंद्रभानला पुढील प्रवासासाठी नकार दिला. पण तेव्हाही, अहो मॅडम मी तुम्हाला माझी सर्व माहिती दिलेली आहे. विश्वास ठेवा मी तुम्हाला फसवणार नाही. मीही त्याच दिशेला चाललो आहे, अशी थाप चंद्रभानने मारली. ही धोक्याची घंटा अनुह्या ओळखू शकली नाही. ती चंद्रभानसोबत बाईकवरून निघाली. संधी मिळताच चंद्रभानने बाईक भांडुपेश्वर कुंडाजवळ नेली. तेथे तिच्यावर अत्याचार केले व नंतर हत्या. गुन्हे शाखेच्या पथकाला चंद्रभानसोबत टर्मिनन्स सोडणार्‍या अनुह्याचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. त्यावरून खबर्‍यांच्या जोरावर गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. आरोपपत्रात अनाहुतपणे अनुह्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आरोपी चंद्रभानची मदत करणार्‍या नंदकिशोर साहू याची साक्ष महत्वाचा पुरावा म्हणून सहभागी करण्यात आल्याचे समजते. त्यासोबत अनुह्या आणि चंद्रभान यांना टर्मिनसहून बाहेर पडताना पाहणार्‍यांच्या साक्षी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. हत्येनंतर त्रंबकेश्वरला जाऊन चंद्रभानने एका ज्योतीषाला आपली जन्मपत्रिका दाखवली होती. ज्योतीषाच्यासल्ल्यानुसार चंद्रभानने कालसर्प योगाची शांतीही करून घेतली होती. त्या ज्योतीषालाही साक्षीदार करण्यात आल्याची माहिती मिळते.