शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मतदार यादीत माझे नाव आहे की नाही?

By प्रगती पाटील | Updated: January 30, 2024 10:27 IST

Voter List: 65आगामी निवडणुकांसाठी  मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यात  माझे नाव आहे की नाही ते कसे शोधायचे? नसेल तर काय करता येईल?  - प्रतिभा घार्गे, पुणे लोकशाहीमध्ये निवडणूक आणि मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे.  पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची उत्सुकता तरुणांमध्ये असते.

- प्रगती जाधव-पाटील (वार्ताहर/ उपसंपादक, लोकमत, सातारा)

आगामी निवडणुकांसाठी  मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यात  माझे नाव आहे की नाही ते कसे शोधायचे? नसेल तर काय करता येईल?  - प्रतिभा घार्गे, पुणेलोकशाहीमध्ये निवडणूक आणि मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे.  पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची उत्सुकता तरुणांमध्ये असते. याबरोबरच बदली होऊन नव्या गावात आलेले मतदार यादीत अपडेटिंग तसेच नाव नोंदणी करतात. आपले नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी आता बूथवर जाण्याची गरज नाही. मतदार यादीत नाव आहे की नाही, हे घरबसल्या तपासता येते. निवडणूक आयोगाच्या http://electoralsearch.in/ वेबसाइटवर नाव दोन प्रकारे शोधता येते. पहिली पद्धत  ‘सर्च बाय डिटेल्स’ आणि दुसरी पद्धत म्हणजे ‘सर्च बाय एपिक नंबर.’ सर्च बाय डिटेल्स या पर्यायात स्वत:चे नाव, पत्ता आणि वय यासारखी माहिती भरावी लागते. यानंतर नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडण्याचे पर्याय समोर येतात. 

त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माहिती समोर येते. यामध्ये ओळखपत्र क्रमांकपासून मतदान केंद्रापर्यंत माहिती  दिसते. स्वत:चे ओळखपत्र क्रमांक (EPIC No.), राज्य आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करायचा आहे. शोध पर्यायावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती मतदाराच्या समोर येते. यामध्ये ओळखपत्र क्रमांक आणि मतदान केंद्रापर्यंत लिहिलेले दिसेल. हवे असल्यास तुम्ही  माहितीची प्रत काढू  शकता. 

मतदार यादीत नाव नसेल तर रहिवासी व ओळखपत्राचा पुरावा आणि दोन फोटो घेऊन तहसील कार्यालयात अर्ज करावा. तेथे मतदार नोंदणी केली जाते. तेथे यादीतील नाव बघता येईल. नसेल तर तेथे नोंदणी करता येईल. येथे मतदारांचे स्थलांतर तसेच नावातील बदलाचीही नोंद घेतली जाते. ज्या मतदारांची नावे  मतदार यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी लोकल बूथ ऑफिसर किंवा मतदार ॲपवरून स्वतःची नोंदणी केली तरीही आगामी निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येईल.(सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

टॅग्स :VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग