शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प कोरडेठाक

By admin | Updated: July 18, 2016 04:39 IST

जुलै महिन्याच्या सुरूवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे अजूनही कोरडीच आहेत.

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या सुरूवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे अजूनही कोरडीच आहेत. विभागातील सर्व धरणांमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ४.५४ टक्के इतकाच जलसाठा होऊ शकला आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. शेकडो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अजूनही अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जुनअखेरीस मराठवाड्यातील सर्व धरणे कोरडी पडली होती. विभागातील पाणीसाठा अर्ध्या टक्क्यांवर आला होता. जुलैच्या सुरूवातीला सर्वदूर दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली. परंतु अजूनही विभागातील धरणे रिकामीच आहेत. १५ जुलैच्या अखेरीस धरणांमध्ये अवघा साडेचार टक्के इतकाच पाणी साठा होऊ शकला आहे. (प्रतिनिधी)>८ प्रकल्पात मृतसाठा मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२१ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीसह आठ मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. केवळ तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम १६४ दलघमीचा साठा होऊ शकला आहे. त्यामध्ये निम्न दूधना, विष्णुपुरी आणि पेनगंगा धरणाचा समावेश आहे. ‘गोदावरी’चे बंधारेही कोरडेठाकगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी गोदावरी नदीवर जायकवाडीपासून नांदेडपर्यंत ११ बंधारे बांधले. त्यांची क्षमता २३१ दलघमीची आहे. मात्र हे बंधारेही अद्याप कोरडेच आहेत. मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी आले आहे. या १८ बंधाऱ्यांमध्ये आतापर्यंत केवळ ३ दलघमी म्हणजे ३.५ टक्केच पाणीसाठा होऊ शकला.पाणीपुरवठा बंदचमध्यम प्रकल्पांची स्थितीही अद्याप सुधारलेली नाही. मराठवाड्यातील ७५ मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ५४ दलघमी (५.८३ टक्के) साठा आहे. त्याचप्रमाणे विभागातील ७३२ लघू प्रकल्पांमध्ये ११७ दलघमी म्हणजे केवळ ७.३५ टक्के साठा आहे. धरणांमध्ये पुरेसे पाणी न आल्यामुळे शेकडो गावातील पाणी पुरवठा योजना अजूनही बंदच आहेत.