शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

By admin | Updated: July 2, 2016 02:55 IST

‘प्रदूषण रोखण्यासाठी समृद्ध वने हाच उपचार... प्रवासा दरम्यान बीजारोपणाचा स्वीकारू नवा विचार’ या घोषवाक्यासह महामार्गावर बीजारोपण मोहीम राबविण्यात आली.

पनवेल : ‘प्रदूषण रोखण्यासाठी समृद्ध वने हाच उपचार... प्रवासा दरम्यान बीजारोपणाचा स्वीकारू नवा विचार’ या घोषवाक्यासह महामार्गावर बीजारोपण मोहीम राबविण्यात आली. ‘लोकमत’ने व्ही. जे. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी अलिबाग व वैभव आॅटोमोबाईल, डीलर्स भारत पेट्रोलियम कोळखे यांच्या सौजन्याने शुक्रवारी पळस्पे येथे आयोजित बीजारोपण मोहिमेत माजी आमदार विवेक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वनमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र वृक्षारोपण मोहिमेला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. महामार्गाच्या दोन्ही बाजूस बीजाचे रोपण केल्यास महिनाभरात नवीन रोपटी याठिकाणी उगवतील व निसर्गाचा समतोल राखला जाईल. हाच विचार करून लोकमतने बीजारोपणाचा उपक्रम राबवून महामार्गावरील वाहन चालकांना बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ग्रामपंचायत पळस्पेच्या सरपंच जयश्री भगत आदी उपस्थित होते. >पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी, कृषी दिनाच्या औचित्याने राज्यात वृक्षलागवड करण्यात आली. त्यानिमित्त ‘लोकमत’च्या वतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजवाटपाची मोहीम राबविण्यात आली.>महाड : कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प राज्य शासनातर्फे केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ तर्फे मुंबई - गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी महाडमधील हॉटेल विसावासमोर आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.मुंबईकडे प्रवास करणाऱ्या खेड तालुक्यातील तिसंगी येथील प्रतीक्षा भोसले यांच्याकडे बीजारोपण करण्यासाठी बीज आ. भरत गोगावले यांच्या हस्ते सुपूर्द करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अण्णासाहेब सावंत बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, शिवाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष काळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विनोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.बीजारोपणाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. राज्यात अशाप्रकारचा एकमेव उपक्र म असावा. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन समतोल राखण्यास मदत होईल. - विवेक पाटील, माजी आमदार