शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणसोबत सिंचन करार

By admin | Updated: March 9, 2016 06:24 IST

महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यातील आंतरराज्य सिंचन प्रकल्पाबाबतचे सर्व निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यासाठी तसेच निर्णय प्रक्रि या गतिमान करण्यासाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.

मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यातील आंतरराज्य सिंचन प्रकल्पाबाबतचे सर्व निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यासाठी तसेच निर्णय प्रक्रि या गतिमान करण्यासाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत उभय राज्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले, आजचा दिवस दोन्ही राज्यांसाठी ऐतिहासिक आहे. राज्यात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, नदीतील समुद्रात जाणारे पाणी दोन्ही राज्यांना वापरता येईल. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर प्रकल्पांच्या कामांकरिता अनुमती द्यावी. या दोन राज्यांमध्ये वॉटर वॉर कधीही होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि तेलंगणचे जलसंपदा मंत्री हरीश राव उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)लेंडी, प्राणहिता, चवेल्ला, निम्न पैनगंगा नदीवरील राजापेट, चानखा-कोटी, पिपरड-परसोडा येथील बॅरेज तसेच भविष्यात हाती घ्यावयाच्या अन्य सिंचन प्रकल्पांसाठी हे आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. लेंडी प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. निम्न पैनगंगा आणि लेंडी प्रकल्पापासून प्रामुख्याने महाराष्ट्रास व प्राणहिता प्रकल्पापासून तेलंगणला लाभ होणार आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील १ लाख ४० हजार ८१८ हेक्टर व लेंडी प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 26,924हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.