शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडाला आकार देता देता हरवला आयुष्याचा आकार!

By admin | Updated: April 27, 2015 03:30 IST

गावाबाहेर रस्त्यालगत फडफडणारी फाटके पाल, अर्धनग्न अवस्थेत खेळणारी निरागस मुलं, अशा स्थितीत लोखंडासारख्या मजबूत धातूला आकार देता देता

निनाद देशमुख, रिसोड (वाशिम)गावाबाहेर रस्त्यालगत फडफडणारी फाटके पाल, अर्धनग्न अवस्थेत खेळणारी निरागस मुलं, अशा स्थितीत लोखंडासारख्या मजबूत धातूला आकार देता देता लोहार बांधव स्वत:च्या आयुष्याला मात्र आकार देऊ शकले नाहीत. विकासाच्या कितीही गप्पा वेगवेगळ्या पक्षांच्या सत्तारूढ सरकारांकडून केल्या जात असल्या तरी या समाजाच्या नशिबी आजही भटकंतीच आहे. कोणत्याही एका गावात फार काळ वास्तव्य नसल्याने या समाजातील बहुतांश कुटुंबांकडे शासनाचे कोणतेही ओळखपत्र नाही, परिणामी कोणतेही अनुदान नाही... या देशाचे आपण नागरिक आहोत, याचा एकही पुरावा त्यांच्याकडे मिळत नाही. पूर्वीपासूनच या देशाची ग्रामीण संस्कृती बारा बलुतेदारांवर अवलंबून होती. ग्रामीण भागात कृषिप्रधान संस्कृती असल्याने शेतीसाठी लागणारे साहित्य तयार करणारा एकमेव कारागीर म्हणजे लोहार बांधव़ वैज्ञानिक क्रांतीचा बदल कृषी संस्कृतीवर झाला. याचा फटका बारा बलुतेदारांंच्या व्यवसायावर झाला. काही बलुतेदारांनी वेगवेगळे व्यवसाय स्वीकारले; परंतु लोहार समाजबांधव पूर्वीच्याच भटकंती अवस्थेत असल्याचे दिसून येते. रस्त्यालगत एखादी फाटकी-तुटकी पाल उभारून दोन-चार भांडी, एखादं कुत्र्याचं पिलू, ऐरण, भाता व कोळशाचं मळकट पोतं हेच जीवन आणि हीच मालमत्ता... लोहार समाजबांधवांची ही परिस्थिती आजही कायम असल्याचे बघायला मिळते; मात्र आता शेतात पेरण्याकरिता जाणारी तिफन हद्दपार होऊन ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र कंपन्यांमधून येत असल्याने तिफनीच्या फाळाला धार लावणारा लोहार बिनकामाचा ठरत आहे. तिफनच कालबाह्य झाल्याने मातीच्या ओलाव्यापासून हा समाज पारखा झाला आहे. पाल मांडल्यावर गावात कामाचा धांडोळा घेणारा लोहार व त्याच्या येण्याची वाट पाहणारी, घनाच्या साहाय्याने लोखंडाला आकार देणारी अर्धांगिनी, धुळीत माखलेली, पोटातील भूक डोळ्यात आणून बापाची वाट बघणारी निरागस मुलं पाहिल्यानंतर स्वातंत्र्य, जागतिक महासत्तेकडे वाटचाल, वैज्ञानिक क्रांती या कल्पना बेगडीच वाटतात. एका गावात वास्तव्य नसल्याने वास्तव्याचा दाखला नाही. परिणामी तो कुठलाही मतदार नाही. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नाही, अनुदान नाही, असं जिणं रिसोड शहरात पालं मांडून बसलेल्या समाजबांधवांच्या नशिबी आलं आहे. लोखंडाला आकार देताना लोहाराच्या पिढ्यांचा आकार हरपत असल्याचं वास्तव दिसत आहे.