शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात लोखंडी रॉड घालून पित्याची हत्या

By admin | Updated: May 7, 2014 01:15 IST

पैशाच्या वादातून एका युवकाने पित्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्याची घटना ठाण्यातील कॅसल मिल परिसरात घडली.

मुंबई : पैशाच्या वादातून एका युवकाने पित्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्याची घटना ठाण्यातील कॅसल मिल परिसरात घडली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी मृताच्या मुलावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.दत्ताराम साळसकर (७०) असे या वृद्ध इसमाचे नाव असून, ते शैलेश साळसकर (३२) या मुलासोबत ठाण्यातील रुणवाल इमारतीत राहत होते. सोमवारी त्यांचे मुलासोबत पैशाच्या वादातून जोरात भांडण झाले होते. या वेळी संतापलेल्या शैलेशने पित्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला आणि घरातून पसार झाला. जखमी साळसकर यांनी अंधेरी परिसरात राहणारे त्यांचे मेहुणे विष्णू परब यांना झालेल्या घटनेची माहिती फोनवर दिली. तसेच मी जखमी असून, अंधेरीला येत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी ठाण्याहून टॅक्सी पकडली. मात्र टॅक्सी अंधेरी परिसरात येताच साळसकर बेशुद्ध झाल्याने टॅक्सीचालकाला संशय आला. त्याने तत्काळ एका ठिकाणी टॅक्सी थांबवून तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना साळसकर यांच्याबद्दल सांगितले. गस्तीवरील एक पोलीस तत्काळ टॅक्सीमध्ये बसला आणि टॅक्सी कूपर रुग्णालयात नेली. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच साळसकर यांचा मृत्यू झाला होता. अंधेरी पोलिसांनी यांच्या तक्रारीवरून शैलेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही घटना ठाणे परिसरात घडली असल्याने अंधेरी पोलिसांनी हा गुन्हा ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.