शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी खाटेने आखले शेत..!

By admin | Updated: June 28, 2016 03:50 IST

शेतकऱ्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. खाटेने शेत आखतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावरुन सर्वत्र फिरत आहे.

जळगाव : कितीही संकटे आली तरी इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. औताचे भाडे देण्याएवढे पैसे गाठिशी नसतानाही परिस्थितीपुढे हार न मानता लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीची लागण पूर्ण केली. खडकी बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील विठोबा हरी मांडोळे या जिगरबाज शेतकऱ्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. खाटेने शेत आखतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावरुन सर्वत्र फिरत आहे.मांडोळे हे सुरुवातीला शेतमजुरीचे काम करायचे मात्र गेल्या सात वर्षांपासून इतरांचे शेत कसायला घेवून ते स्वत: शेती करीत आहेत. या दरम्यान त्यांनी मेहनतीतून बऱ्यापैकी प्रगती साधली. वयाच्या पंचेचाळीशीनंतर स्वत:चे घरही उभे केले. बैल जोडी घेतली. मात्र गेल्या दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीने त्यांना आर्थिक विवंचनेत टाकले. गेल्या वर्षी तर अधिकच नुकसान झाले. चारा- पाणी नसल्याने यंदा बैलजोडीही विकावी लागली. हे सर्व आघात सहन करीत असताना यंदा नव्या उमेदीने ते पुन्हा उभे राहिले आहेत. तीन एकर शेत त्यांनी कसायला घेतले असून शेतात सऱ्या पाडण्यासाठी औताचे भाडे देण्याची ऐपत नसल्याने त्यांनी लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीचे बियाणे लावले आहे. उर्वरीत एक एकरात मक्याचे बियाणे लावणार असून हे बियाणे त्यांनी उधारीवर आणले आहे. निसर्गाने साथ दिली, चांगला पाऊस पडला तरच कापूस आणि मका शेती बहरेल आणि आयुष्याचा सारा मोहोर फुलून जाईल, अशी आशा ते व्यक्त करतात. (प्रतिनिधी) >नुकसानीस पात्र नाहीमांडोळे यांनी दुसऱ्याची शेती कसायला घेतली आहे. त्यामुळे त्याचा स्वत:चा ७/१२, खाते उतारा नसल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस ते पात्र ठरत नाही. कृषी विभागातर्फे कपाशी बियाणे, तूर बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. मिळण्यासाठी त्यास मदत केली जाईल, असे चाळीसगावचे तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी सांगितले.