शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उंची वाढविण्यासाठी युवकाने केसात लपविली लोखंडी पट्टी

By admin | Updated: March 31, 2017 02:04 IST

पोलिसांना फसविण्याचा प्रयत्न फसला!

अकोला, दि. ३0- पोलीस भरतीदरम्यान एका युवकाने उंची वाढविण्यासाठी डोक्यातील केसांमध्ये चक्क लोखंडी पट्टी लपवून ठेवली; परंतु चाणाक्ष पोलिसांच्या ही बाब ध्यानात आल्यावर त्याला बाजूला काढत, त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर २२ मार्चपासून पोलीस भरती सुरू आहे. या भरतीमध्ये राजपुर्‍यातील करण राजकुमार घोडके (२१) हासुद्धा पोलीस भरतीत सहभागी झाला. पोलीस दलात सहभागी होण्यासाठी आपली उंची कमी पडेल, असे वाटल्यामुळे करणने १६५ सें.मी. उंची भरावी, या उद्देशाने त्याने डोक्यातील केसांमध्ये लोखंडी पट्टी लपविली आणि तो गुरुवारी पोलीस भरतीसाठी आला. भरतीदरम्यान त्याची शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात आली. यावेळी तैनात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी तपासणी केली. तपासणीदरम्यान करण घोडके याने डोक्यातील केसांमध्ये लोखंडी पट्टी लपविली असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला बाजूला काढले. पोलिसांना मामू बनविण्याचा करणचा प्रयत्न सपशेल फसला. यापूर्वी नाशिक येथील पोलीस भरतीमध्ये एका युवकाने उंची वाढविण्यासाठी डोक्यावर विग काढल्याची घटना ताजीच आहे. त्यानंतर अकोल्यात दुसरी घटना घडली. विशेष म्हणजे, गतवर्षीसुद्धा करण घोडके हा पोलीस भरतीत सहभागी झाला होता; परंतु उंची कमी पडल्यामुळे त्याला पात्रता फेरीतून बाद व्हावे लागले होते. यंदा उंची भरून काढायची आणि पोलीस दलात सहभाग व्हायचे, असा चंगच त्याने बांधला होता आणि येथेच त्याची बनवेगिरी उघडकीस आली. पोलीस कर्मचारी गीतेश कांबळे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी करणविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.