शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आयर्लंडचे पंतप्रधान उकडीच्या मोदकांचे फॅन

By admin | Updated: June 3, 2017 03:26 IST

आयर्लंडचे पंतप्रधान झालेले कोकणचे सुपुत्र लिओ वराडकर मराठी खाद्यपदार्थांच्या विशेष प्रेमात आहेत. ‘आजही त्यांच्या जेवणात आठवड्यातून

संकेत सातोपे / लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयर्लंडचे पंतप्रधान झालेले कोकणचे सुपुत्र लिओ वराडकर मराठी खाद्यपदार्थांच्या विशेष प्रेमात आहेत. ‘आजही त्यांच्या जेवणात आठवड्यातून एकदा तरी भारतीय, त्यातही मराठी पदार्थ आवर्जून असतात. कोकणात केले जाणारे उकडीचे मोदक म्हणजे लिओचा जीव की प्राण!’ मुंबईत राहणारी लिओची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी त्यांच्या कौटुंबिक आठवणींना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला.लिओ यांचे दोन्ही काका मधुकर आणि मनोहर वराडकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यातही मधुकर यांनी मालवणचे महापौरपदही भूषविले होते. आपल्या वाडवडिलांच्या या कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा लिओ यांना जाज्वल्य अभिमान आहे. ते अनेकदा मुंबईत येऊन गेले आहेत आणि प्रत्येक वेळी ते वराडकर कुटुंबियांना आवर्जुन भेटले आहेत. त्यांना भरपूर वेळ देतात, असेही शुभदा यांनी सांगितले. शुभदा आणि त्यांची भाची मिताली वराडकर या ओडिसी नर्तिका आहे. कार्यक्रमांनिमित्त त्यांचे अनेकदा विदेशात जाणे होते. ‘आम्ही दोघी आयर्लंडला गेलो होतो. तेव्हा लिओ यांनी आम्हाला आवर्जुन आयरिश संसद फिरवून आणली,’ अशी आठवण मिताली सांगते.माझी काकी (लिओ यांची आई) आयरिश आहे, मात्र त्यांचेही भारतीय संस्कृती-खाद्यपदार्थांवर विशेष प्रेम आहे. लिओ यांना तर भारतीय इतिहास, राजकारण याबाबत पहिल्यापासून ओढ आहे. लहानपणीही आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा तेव्हा त्यांनी मला भारताच्या इतिहास आणि राजकारणाबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. खरंतर कायद्याचे शिक्षण घेण्याची त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. पण घरात आई-वडिल, बहिण सगळेच वैद्यकीय पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्यांनीही डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. मुुंबईत केईएममध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून वर्षभर काम करताना त्यांना भारतीय संस्कृती आणखी जवळून अनुभवता आली, असेही शुभदा यांनी सांगितले.