शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल निकालावरून वृद्धाची केली फसवणूक

By admin | Updated: June 8, 2017 03:49 IST

एसएमएसद्वारे देऊन १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न एका ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या चांगलाच अंगलट आला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ‘आयपीएल क्रि केट मॅचचा अंतिम सामना कोण जिंकणार?’ या प्रश्नाचे उत्तर एसएमएसद्वारे देऊन १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न एका ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. बक्षिसाची ही रक्कम मिळवण्यासाठी २५ हजार रुपयांचा टीडीएस भरण्यास सांगून या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे.गोदरेज हिल भागात राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मोबाइलवरील एसएमएसवर आयपीएल क्रि केट मॅचच्या दरम्यान ‘आयपीएल कोण जिंकेल?’ असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणाऱ्यास १० लाख रुपये जिंकण्याची आॅफर देण्यात आली होती. त्या ज्येष्ठ नागरिकाने या एसएमएसला उत्तर दिल्यानंतर त्याच नंबरवरून ज्येष्ठ नागरिकाला आर.के. शर्मा याने फोन करत फायनल मॅचच्या निकालात तुमचा नंबर निवडला गेल्याचे सांगितले. तुम्हाला १० लाखांचे बक्षीस लागले आहे. मात्र, बक्षिसाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा करण्यासाठी टीडीएस चार्ज भरावा लागेल, असे सांगितले. त्यावर, विश्वास ठेवत ज्येष्ठ नागरिकाने शर्मा याने दिलेल्या खात्यावर २५ हजार रु पये जमा केले. मात्र, त्यानंतर बक्षीस न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या ज्येष्ठ नागरिकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे गुन्हा दाखल झाला आहे.