शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची ८० लाखांची फसवणूक

By admin | Updated: January 25, 2017 03:34 IST

गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचा परतावा व खुले प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एजंट व ग्राहकांची सुमारे ८० लाख २० हजार ७६० रुपयांची फसवणूक

सांगोला (जि. सोलापूर) : गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचा परतावा व खुले प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एजंट व ग्राहकांची सुमारे ८० लाख २० हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील रिलायबल फोर्स इन्फ्रा अ‍ॅग्रो कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीने लकी ड्रॉ योजनेद्वारे शेकडो ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचेही तपासातून पुढे आले आहे. मोहन विष्णू राऊत, विष्णू भीमराव राऊत, (रा. बनकरवाडी, सांगोला), संदीप बाजीराव आदलिंंगे, सुभाष बाजीराव आदलिंंगे, माया संदीप आदलिंगे (रा. सर्व कमलापूर, ता.सांगोला) व हनुमंत नारायण शेंबडे (इसबावी, ता. पंढरपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या संचालकांची नावे आहेत.बनकरवाडी येथील मोहन विष्णू राऊत याने २८ एप्रिल २०१३ मध्ये रिलायबल फोर्स इन्फ्रा अ‍ॅग्रो या नावाने सांगोल्यातील फुले कॉम्प्लेक्स याठिकाणी कार्यालय सुरु केले़ राऊत यांनी कंपनीकडे गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकात जवळपास ३०० एजंटांची नेमणूक केली़ या एजंटांमार्फत कंपनीने जून २०१३ ते जानेवारी २०१५ या कालावधीत हजारो ग्राहकांकडून १०० च्या पटीत ५ लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर १६ टक्के व्याज व खुले प्लॉट नावावर करण्याचे आमिष दाखवून सुमारे ८० लाख २० हजार ७६० रु.च्या ठेवी जमा केल्या. त्यानंतर परतावा देण्याची वेळ आल्यावर कार्यालय बंद करुन पोबारा केल्याचे हलकुरकी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान राऊत याने सांगोल्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून मोठ्या बक्षीसांचे आमिष दाखवून हजार रुपयांच्या पटीने लाखो रुपये जमा करून त्यांनाही बक्षीसाचे वाटप केले नसल्याचे तपासातून पुढे आले आहे. (वार्ताहर)