शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांमुळे गुंतवणूक कमी

By admin | Updated: March 3, 2016 04:32 IST

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे.

मुंबई : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे. आर्थिक घोटाळ्यांमुळे गुंतवणुकीवर विपरित परिणाम होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग व इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आर्थिक गुन्ह्यांविरोधी लढा या कार्यशाळेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा, अतिरिक्त संचालक वाय. सी. मोदी, इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन अश्वनी कुमार, व्हाईस चेअरमन अरुंधती भट्टाचार्य आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सद्य:परिस्थितीमध्ये आर्थिक फसवणुकीच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. हे गुन्हेगार गुंतवणुकीच्या फसव्या योजनांतून मोठ्या प्रमाणात पैसा जमा करतात व परदेशात पळून जातात. अशा गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तपासाच्या पध्दती बदलल्या पाहिजेत. गुंतवणूकदारांच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे किंवा कसे हे तपासणेही महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याकडे देशाची वाटचाल सुरु आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे व त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही वित्त, तसेच कायदे व सुव्यवस्था क्षेत्रातील यंत्रणांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)1.20लाख कोटींची फसवणूककेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा म्हणाले की, विभागाने २०१५ मध्ये बँक घोटाळयाच्या १७१ केसेसचा तपास केला असून ही रक्कम २० हजार ६४६ कोटी रु पये आहे. तर ग्राहकांची फसवणूक केलेल्या फसव्या योजनांच्या माध्यमातून गोळा केलेली रक्कम १ लाख २० हजार कोटी इतकी आहे.