शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात १ लाख कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: October 18, 2015 02:20 IST

महाराष्ट्रात कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही. अनेक गुंतवणूकदार तयार आहेत. त्यांना फक्त ‘क्लीन प्रोजेक्ट’ची हमी हवी आहे. राज्यात एक लाख कोटी रुपयांची

नागपूर : महाराष्ट्रात कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही. अनेक गुंतवणूकदार तयार आहेत. त्यांना फक्त ‘क्लीन प्रोजेक्ट’ची हमी हवी आहे. राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. त्यामुळे एक लाख प्रत्यक्ष व तीन लाख अप्र्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. नागपुरातील मिहानसोबतच औरंगाबादलाही औद्योगिक दृष्टीने विकसित करण्याचा आपला मानस आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस सरकारची ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी संवाद साधत सरकारची धोरणे व योजना मांडल्या. ते म्हणाले, फॉक्सॉन, सॉफ्टबँक व त्यांच्याशी संलग्न अलीबाबा आणि टॉरीगॉन यांसारख्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. सॉफ्टबँकला दोन हजार एकर जमिनीवर सोलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा आहे. सोबतच दोन हजार मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्पही उभारण्यास ते इच्छुक आहे. मिहानमध्येही एक मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी येण्याची अपेक्षा आहे. ही कंपनी थायलंड व मलेशिया येथे सुरू असलेले काम बंद करून नागपुरात काम सुरू करण्यास तयार आहे. अमरावती येथे इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यात आले आहे. चंदीगडच्याही बऱ्याच कंपन्या येथे येण्यास इच्छुक आहेत. यवतमाळ, जळगाव, बुलडाणा, बीड, वर्धा यासह अन्य कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्येही असेच पार्क उभारले जातील. त्या अंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार केले जाईल. कंपनी या शेतकऱ्यांकडून थेट सोयाबीन खरेदी करेल. (विशेष प्रतिनिधी)१०० प्रकल्पांना निधीराज्य मंत्रिमंडळाने पहिल्या वर्षात राज्यातील सर्व रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. सर्व आवश्यक प्रकल्पांना सरकारतर्फे निधी दिली जाईल. या वर्षी अशा १०० प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.