शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ममता कुलकर्णीला फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरची चौकशी

By admin | Updated: June 10, 2016 02:29 IST

चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णीने अविवाहित असताना सुमारे वीस वर्षांपूर्वी आपल्याकडून फ्लॅट खरेदी केले होते

मुंबई : चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णीने अविवाहित असताना सुमारे वीस वर्षांपूर्वी आपल्याकडून फ्लॅट खरेदी केले होते, असा खुलासा बिल्डर शब्बीर नूर मोहंमद पटेल याने ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. ठाणे येथे हस्तगत केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी या दोघांची नावे पुढे आल्याने ठाणे पोलिसांनी त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यास सुरुवात केली आहे. चौकशीदरम्यान ममता कुलकर्णीने शब्बीर नूर मोहंमद पटेल याच्याकडून अंधेरी परिसरात चार फ्लॅट खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी या बिल्डरची चौकशी सुरू केली. त्यावर ममता कुलकर्णी ही टॉपची अभिनेत्री असताना तिने आणि तिची आई मीरा कुलकर्णी यांनी आपल्याकडून अंधेरी येथील यारी रोडवरील अर्शी कॉम्प्लेक्स परिसरात चार फ्लॅट खरेदी केले होते. त्याचा विक्रीव्यवहार कायदेशीर असून विक्रीखतही आपल्याकडे आहे. त्यानंतरच्या काळात तिचा विवाह झाल्याने या फ्लॅट खरेदीशी विकी गोस्वामीचा काहीही संबंध नसल्याचे बिल्डरने या पत्रात म्हटले आहे. आपल्या काही नातेवाइकांशी वाद असल्याने त्यांनी चुकीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवून आपल्याला नाहक या प्रकरणात गोवल्याचेही बिल्डरने नमूद केले आहे.