शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेतील घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

By admin | Updated: April 1, 2017 03:10 IST

राज्य सहकारी बँकेतील १,५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील १,५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासात आमदार जयप्रकाश मुंदडा, सुरेश हाळवणकर, प्रकाश अबिटकर, आशीष शेलार, अनिल गोटे, अतुल भातखळकर आदी सदस्यांनी या गैरव्यवहारांची चौकशी संथगतीने होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ३० महिने उलटल्यानंतरही चौकशी पूर्ण का होत नाही, अशी नाराजी व्यक्त करीत त्यांनी मंत्री देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी चौकशी पूर्ण करण्यासाठी २२ नोव्हेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतू या प्रकरणात न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे चौकशी वेळेत पूर्ण होण्यास विलंब झाला. त्यामुळे एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, अशी चौकशी अधिकाऱ्यांनी विनंती केली. परंतू या चौकशीला अजून मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यामुळे ही चौकशी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल. त्यात गैरव्यवहाराच्या जवळपास दोन हजार प्रकरणांचा समावेश आहे. या गैरव्यवहारात असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती वा संस्थेला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)गैरकारभारामुळे प्रशासक मंडळआघाडी सरकारच्या काळात झालेल्या या गैरव्यवहारांमुळे खळबळ उडाली होती. बँकेवर प्रशासक मंडळ बसविले होते.