शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

प्राइम डेव्हलपर्सची ईडीकडून चौकशी

By admin | Updated: December 13, 2015 03:01 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाशी निगडित प्राइम डेव्हलपर्स आणि बिल्डर्सने लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोकडून

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमहाराष्ट्र सदन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाशी निगडित प्राइम डेव्हलपर्स आणि बिल्डर्सने लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोकडून मिळालेल्या २०० कोटी रुपयांतून कोणकोणत्या मालमत्ता खरेदी केल्या, याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.निवासी इमारतींचा प्रकल्प विकसित करण्याचे अधिकार लार्सन अँड टुब्रो कंपनीने ४८० कोटी रुपयांना घेतले होते. ते त्यांनी चमणकर एन्टरप्राईसला २८० कोटी रुपयांना व प्राइम डेव्हलपर्स अँड बिल्डर्सना २०० कोटी रुपयांना विकले होते.विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘लार्सन अँड टुब्रोकडून प्राइम डेव्हलपर्सने २०० कोटी रुपये, तर चमणकर एंटरप्राइजेसने २८० कोटी रुपये घेतले. महाराष्ट्र सदन, अंधेरी आर.टी.ओ. क्वॉर्टर्स आणि विश्रामगृह यांच्या बदल्यात ४३ हजार चौरस मीटर जमीन विकसित करण्याचे अधिकार चमणकर एंटरप्राइजेसला मिळाले होते. तथापि, या कामी चमणकर एंटरप्राइजेसने प्रमुख वित्तपुरवठादार म्हणून प्राइम डेव्हलपर्सला खेचले आणि नफ्यातील ६० टक्के वाटा देण्याचेही कबूल केले. त्या बदल्यात प्राइम डेव्हलपर्सने हेच काम ८५० कोटी रुपयांत करण्यासाठी लार्सन अँड टुब्रोला खेचले. त्यापैकी लार्सन अँड टुब्रोने ४८० कोटी रुपये खर्च केले. चमणकर एंटरप्राइजेसने २८० कोटी रुपयांचा उपयोग करीत महाराष्ट्र सदन आणि अन्य इमारती बांधल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या २०० कोटी रुपयांतून प्राइम डेव्हलपर्सने खरेदी केलेल्या इतर मालमत्तांचा आम्ही आता शोध घेत आहोत,’ असे हा अधिकारी म्हणाला.भुजबळ कुटुंबीयांचाही संबंधमहाराष्ट्र सदन आणि कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी १७ जून रोजी अंमलबजावणी विभागाने फिर्याद नोंदविली आहे. या प्रकरणी भुजबळ यांच्या निके एंटरप्राइजेझेस, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इदिन फर्निचर या तीन कंपन्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी समीर आणि पंकज भुजबळ निके व ओरिजिन एंटरप्राइजेसचे संचालक आहेत. समीर पत्नी शेफाली आणि पंकज यांची पत्नी विशाखा इदिन फर्निचरच्या संचालक आहेत.महाराष्ट्र सदन बांधण्याचे अधिकार मिळालेल्या चमणकर एंटरप्राइजेसने या कंपन्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली आहे. याच काळात नंतर आलेल्या प्राइम डेव्हलपर्सनेही या तीन कंपन्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याचे हा अधिकारी म्हणाला.महाराष्ट्र सदनप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सप्टेंबरमध्ये चमणकर एंटरप्राइजेसच्या १७.३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.