शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाच्या दृष्टीनेही तपास

By admin | Updated: February 29, 2016 03:38 IST

वरेकर कु टुंबीयांना दोन वर्षांपूर्वी कोणी एका ‘भोंदू’बाबाने औषध दिले होते. ते प्राशन केल्यामुळे या कुटुंबीयांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

पंकज रोडेकर,  ठाणेवरेकर कु टुंबीयांना दोन वर्षांपूर्वी कोणी एका ‘भोंदू’बाबाने औषध दिले होते. ते प्राशन केल्यामुळे या कुटुंबीयांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या चर्चेबरोबर मारेकरी हुसनैनविरोधात किंवा वरेकर कुटुंबीयांविरोधात कोणती तक्रार आहे का, अशा विविध अंगांनी पोलिसांनी आता तपास सुरू केला, तसेच विविध घेतलेल्या नमुन्यांसह शवविच्छेदनाचा अहवाल आणि बचावलेल्या बहिणीच्या जबानीनंतर यामागील रहस्याचा उलगडा होणार आहे.रविवारी पहाटे हसनैन याने आईवडील, पत्नी, मुलांसह बहिणी आणि भाचा-भाची अशी १४ जणांची गळा चिरून हत्या करून, त्याने आत्महत्या केल्याची बातमी सकाळीच वाऱ्यासारखी पसरली. या भीषण हत्याकांडामुळे या कुटुंबीयांना दोन वर्षांपूर्वी विषबाधा झाल्याने, रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याच्या वृत्ताचीही उघडउघड शहरात चर्चा सुरू झाली. त्यामुळे तर्कवितर्क मांडले जाऊ लागले आहेत. याबाबत, तेथील स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना, वरेकर कुटुंबीयांना विषबाधा झाल्याचे त्यांनाही समजल्याची प्रतिक्रिया दिली, तसेच मयत अन्वर वरेकर यांचा भाऊ रिझवान इस्माईल वरेकर यांनी, दोन वर्षांपूर्वी एनर्जी ड्रिंक म्हणून एका बाबाने या कुटुंबाला एक औषध दिले होते. त्यांना दिलेल्या त्या औषधाच्या मात्रेपेक्षा अधिक मात्रा घेतल्याने, त्यांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यामध्ये लहान मुलांचा समावेश नव्हता, पण ते कोणी दिले, याबाबत त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, चर्चांवर भाष्य करता येणार नाही, पण त्यांनी घेतलेल्या औषधासह ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले, तेथील रेकॉर्ड गोळा करण्यात येणार आहे, तसेच या कुटुंबीयांविरोधात कोणती तक्रार आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर, हसनैनच्या मोबाइल आणि संगणकावरील रेकॉर्डही तपासण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच त्याच्या कामाच्या ठिकाणी एक पथक पाठवले आहे.अन्वर वरेकर दर्ग्याचे ट्रस्टी : मूळचे कासारवडवली गावातील रहिवासी असलेले मयत अन्वर वरेकर (५८) हे वीरा केमिकल कंपनीत कामाला होते. सेवानिवृत्तीनंतर इस्टेट एजंट म्हणून काम करीत, तसेच ते जुने रहिवासी असल्याने, कासारवडवली-आनंदनगर येथील परदेशीबाबा या दर्ग्यात ट्रस्टी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.