शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने व्हावा

By admin | Updated: March 10, 2016 03:47 IST

महिलांवरील अत्याचारात वाढ होणे हे चिंतेची बाब असली तरी त्यासंबंधी अधिकाधिक गुन्ह्यांची नोंद झाली पाहिजे. पोलिसांकडून त्याचा तपासही जलदगतीने झाला

मुंबई: महिलांवरील अत्याचारात वाढ होणे हे चिंतेची बाब असली तरी त्यासंबंधी अधिकाधिक गुन्ह्यांची नोंद झाली पाहिजे. पोलिसांकडून त्याचा तपासही जलदगतीने झाला तरच गुन्हेगारांवर आळा बसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. मुंबई पोलिसांच्या १०३ या महिला हेल्पलाईनच्या माहितीपटाचे अनावरण व वुमेन्स जर्नालिस्ट असोसिएशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रेरणा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी महिलांच्या सुरक्षेबाबतचे मोबाइल अ‍ॅप येत्या महिन्याअखेरपर्यंत मुंबईत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आजच्या युगात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या सर्वांची नोंद पोलिसांकडे होत नाहीत. अधिकाधिक नोंद झाल्यास त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. तरच गुन्हेगारांना आळा बसेल आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून त्यासाठी आवश्यक असल्याचे सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी महिला पत्रकारांना भेडसाविणाऱ्या समस्या विषद केल्या. स्वागत संघटनेच्या अध्यक्षा मनीषा गुरव यांनी केले. सचिव पूनम अपराज यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)