शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूर देवस्थानाच्या गैरव्यवहाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 22:24 IST

तुळजापूर देवस्थान मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 2 - तुळजापूर देवस्थान मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीच्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांच्यासमोर नुकतीच सुनावणी झाली. खंडपीठाने सीबीआयमार्फत चौकशी करण्याची परवानगी दिली. याविषयी सीबीआयला नोटीस बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. याचिकेवर १२ जानेवारी २०१७ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.तुळजापूर देवस्थान मंदिराच्या व्यवस्थापन समितीने दानपेटीच्या लिलावात घोटाळा केला होता. गुत्तेदारांनी कमी दान येत असल्याचे दाखवून लिलावामध्ये कमी दराने दानपेट्या घेतल्या. १९९१ ते २००८ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दानपेटीत गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले. व्यवस्थापन समितीमध्ये उस्मानाबाद जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. हिंदू जनजागरण समितीने आरोप केला होता की, व्यवस्थापन समितीने गैरव्यवहार केला आहे. त्यांनी याबाबत सहाय्यक धमार्दाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २००८ मध्ये तुळजापूर देवस्थान मंदिराच्या भूमी घोटाळ्याची चौकशी सुरू केली. त्याचा अहवाल न्याय व विधी विभागाकडे प्राप्त झाला. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. या गैरव्यवहार प्रकरणाच्या वेगवेगळ्या याचिका सध्या खंडपीठात प्रलंबित आहेत. हिंदू जनजागरण समितीने सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती आपल्या याचिकेत केलेली असून याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली असता खंडपीठाने परवानगी दिली, असे हिंदू जनजागरण समितीचे वकील सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.