शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हत्यांचा तपास बालिशपणेच!

By admin | Updated: June 24, 2016 05:34 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास कूर्मगतीने सुरू असल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. तपास बालिशपणे सुरू असल्याचे कोर्टाने

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास कूर्मगतीने सुरू असल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. तपास बालिशपणे सुरू असल्याचे कोर्टाने सीबीआय व एसआयटीला सुनावले.सीबीआय व एसआयटीचा अहवाल असमाधानकारक असल्याचे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले. तपासयंत्रणांनी हत्येचा तपास काळजीपूर्वक आणि संवेदनशीलपणे केला पाहिजे. दोन ख्यातनाम लोकांनी त्यांच्या विचारांपायी व सामाजिक कार्यापायी जीव गमावला. या घटनांमुळे बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, मत मांडण्याचे स्वातंत्र्य पणाला लागले आहे, असे सांगत, तपासयंत्रणांना पुढील अहवालासाठी सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली. खंडपीठाने सीबीआयला स्कॉटलंडकडून बॅलेस्टिक रिपोर्ट सहा आठवड्यांत मिळवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने पनवेलमधील वीरेंद्र तावडेला अटक केली. पानसरे प्रकरणातही एसआयटी तावडेला ताब्यात घेणार असल्याचे मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे म्हणाले. त्यावर खंडपीठाने एसआयटीचेच वाभाडे काढले. तुम्हाला त्या व्यक्तीविषयी आणि ती व्यक्ती ज्या संस्थेशी जोडलेली आहे, त्याविषयी यापूर्वी माहीत नव्हते? असा सवाल करून मृतांच्या कुटुंबीयांनाच संशय कोणावर आहे, असे विचारणे लाजिरवाणे आहे. हे थांबले पाहिजे. (प्रतिनिधी)तपास सीबीआयकडे वर्ग करणार का?कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी सरकारकडे केली आहे. त्यावर सरकारनेही तशी तयारी दर्शविली. त्यानुसार या हत्येप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी न्यायालयाला दिली. त्यावर खंडपीठाने, ‘अचानकपणे विचार का बदलला,’ असा सवाल केला. सीबीआयने दाभोलकर केसमध्ये एकाला अटक केली. त्यामुळे पानसरे हत्येचाही तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांची आहे आणि राज्य सरकारही आनंदाने त्याला होकार देत आहे. कारण तुमच्या खांद्यावरील ओझे हलके होईल. एक डोकेदुखी जाईल, अशा शब्दांत खडसावत न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला का? अशी विचारणा अ‍ॅड. संदीप शिंदे यांच्याकडे केली.अद्याप याबाबत आपल्याला सूचना नाही, असे अ‍ॅड. शिंदे यांनी खंडपीठाला सांगितले. तथापि, तुम्ही हा तपास सीबीआयकडे वर्ग करणार असाल तर आम्हाला आधी माहिती द्या आणि का वर्ग करणार, याची कारणेही द्या, असे खंडपीठाने सरकारला स्पष्ट बजावले. माध्यमांना माहिती मिळते कशी ?तपासयंत्रणेने सादर केलेला अहवाल बातमीसाठी असलेला मसाला आहे. आता देण्यात आलेल्या तपास अहवालातील सर्व माहिती आधीच प्रसिद्ध झाली आहे. या प्रकरणातील साक्षीदार कोण आणि पोलीस छापा टाकण्यासाठी कुठे जाणार आहेत? याची माहिती ्रसारमाध्यमांना मिळतेच कशी? प्रत्येक गोष्ट माध्यमांना सांगितली जाते. तुम्ही अशाच प्रकारे वागत राहिलात तर तुम्ही संपूर्ण तपासाची वाट लावाल. फरार आरोपीला तपासाची संपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिळत असेलच. ‘हॅट्स आॅफ सीबीआय,’ असे खंडपीठाने संतापत म्हटले. पीडितांच्या कुटुंबीयांनीही सहनशीलता व धीर ठेवणे आवश्यक आहे. पब्लिसिटीमुळे तपासावर परिणाम होत आहे. आरोपी सुटला की न्यायालय, वकील आणि पोलिसांना दोष दिला जातो. मात्र या माध्यमांमुळे आरोपी सुटण्याचे प्रमाण वाढत आहे, असे खंडपीठाने नाराजीच्या सुरात म्हटले.