शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रा वाघ यांच्या संस्थेची चौकशी

By admin | Updated: January 8, 2016 03:48 IST

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अध्यक्ष असलेल्या दीक्षा सामाजिक संस्थेला मिळालेल्या शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याच्या कंत्राटाची

यदु जोशी,  मुंबईराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ अध्यक्ष असलेल्या दीक्षा सामाजिक संस्थेला मिळालेल्या शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याच्या कंत्राटाची विशेष अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले होते. बाजारात गोडेतेलाचे भाव १२५ रुपयांपेक्षा कमी असताना या संस्थेने १६० ते १९६ रुपये दराने तेल पुरविले. तांदूळ, केळी, मिरची, हळद, साखरेच्या दरांबाबतही हेच घडले. त्याच त्या संस्थांकडून याबाबतचे दर घेण्यात आले. विशिष्ट संस्थांनाच फायदा होईल, अशा पद्धतीने जीआर काढण्यात आले. प्रत्येक जीआर काढणारे कार्यासन अधिकारी सुहास चव्हाण हेच होते. दीक्षा सामाजिक संस्थेला त्यांचे काम समाधानकारक असेपर्यंत अन्नधान्यपुरवठ्याचे काम देत राहावे, असा अनाकलनीय उल्लेख जीआरमध्ये होता. त्यामुळे २०१० ते २०१५ या काळात संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील अनेक रुग्णालयांना अन्नधान्य पुरविण्याचे कंत्राट मिळत राहिले. राज्य कर्मचारी आरोग्य विमा योजनेचे आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घोटाळ्याची चौकशी केली आणि एकूणच प्रक्रियेत झालेल्या अनियमिततांवर बोट ठेवले होते. याच अहवालाचा आधार घेत या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली होती. ‘लोकमत’ने दिलेले वृत्त आणि चौकशी समितीच्या अहवालाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांना विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचे आदेश दिले. चित्रा वाघ यांच्या संस्थेला निविदा न काढता कोट्यवधी रुपयांचे कंत्राट कसे देण्यात आले, त्यासाठी काढण्यात आलेल्या ‘जीआर’बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २२ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते.त्याच दिवशी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या घोटाळ्याचा चौकशी अहवाल विधानसभेत सादर केला.विधिमंडळाचे अधिवेशन संपता संपता या प्रकरणी एसीबी चौकशीची शिफारस आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.विदर्भातील शासकीय रुग्णालयांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांशी संबंधित संस्थांना देण्यात आले होते.ते देताना कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसविण्यात आली आणि अन्नधान्याच्या दरांबाबतही गडबड होती, असे म्हटले जात असून या प्रकरणी चौकशी केल्यास अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.