शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची 'एसआयटी'मार्फत चौकशी करा- भाजपा

By admin | Updated: March 8, 2017 18:07 IST

रस्ते घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी करीत भाजपाने आज शिवसेनेवर पहिला हल्लाबोल केला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - महापालिकेत झालेल्या रस्ते घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी करीत भाजपाने आज शिवसेनेवर पहिला हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या मागणीला विरोधकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत स्वपक्षीय सदस्यच आयुक्तांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मागणी फेटाळून लावली. विधानसभेत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या कंत्राटाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. अनेक रस्त्यांची कामे बेकायदेशीररीत्या काढण्यात आली, या कंत्राटांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शशिकांत शिंदे, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी सांगितले. दरवर्षी मुंबई महापालिका 2400 कोटी रुपये रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी खर्च करत असते. 2016पर्यंतच्या अशा कामांच्या पालिका आयुक्तांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ही चौकशी सुरू असतानाच घाईघाईत 2017मध्ये पुन्हा रस्त्यांच्या कामांचा हजारो कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले, स्थायी समितीतील सदस्यांनीच त्याला आक्षेप घेतल्याचे शेलार यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदारांना अन्य महापालिकांमध्ये कामे दिली जात आहेत. त्यामुळे अशा कंत्राटदारांबाबत सरकारने धोरण निश्चित करण्याची मागणीही केली. मुंबई महापालिकेत पारदर्शकता आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून, या संपूर्ण घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. त्यांच्या भूमिकेस काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला.