अहमदनगर : दलित हत्याकांडाला महिना उलटून गेला तरी पोलीस अद्याप आरोपीर्पयत पोहोचू शकले नाहीत़ गृहखाते सांभाळणा:या मुख्यमंत्र्यांना या घटनेचे गांभीर्य नाही़ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, जवखेडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे वर्ग करून आरोपींना गजाआड करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा़ राजीव सातव यांनी दिला़
जवखेडे खालसा येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आयोजित निषेध सभेत ते बोलत होत़े या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, उपाध्यक्ष सत्यजीत तांबे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे, राष्ट्रीय प्रभारी हिंमत सिंग आदी उपस्थित होत़े सातव म्हणाले, राज्यभर सत्कार घेत फिरणारे मुख्यमंत्री गृहखात्याचा पदभार सांभाळत आहेत, मात्र जवखेडय़ात येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही़ या संवेदनशून्य सरकारविरोधात आवाज उठविणार असून, येत्या 1क् दिवसांत हत्याकांडाचा तपास लागला नाहीतर राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही़, असा इशारा सातव यांनी दिला़
विश्वजीत कदम म्हणाले, नगर जिल्ह्यातील ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पोलीस आणि शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून आरोपींना गजाआड कराव़े सत्यजीत तांबे म्हणाले, या घटनेमुळे दलितांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा
दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रदेश युवक काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात राज्यभरातून आलेले कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े