शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दिग्गजांच्या आविष्काराने स्वरयज्ञ सुरू

By admin | Updated: December 12, 2014 00:18 IST

पाटणकर यांचे माधुर्यपूर्ण गायन अशा जुन्या-नव्या कलाकारांच्या सांगीतिक मैफलीने ‘स्वरयज्ञा’चा पहिला दिवस रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला.

संगीत मैफलीची नांदी : पं. शिवकुमार शर्माचे जादुई संतूरवादन, पं. जसराज यांचे अभिजात गायन
पुणो : पं. शिवकुमार शर्मा यांचे  ‘मंजूळ, भावपूर्ण आणि जादुई संतूरवादन,संगीतमरतड पं. जसराज यांची अभिजात गायकी, पंडितजींच्या आठवणी, रसिकांशी संवाद आणि शिष्यांची मैफल,  तसेच  भीमण्णा जाधव यांचे बहारदार सुंद्रीवादन.. सानिया पाटणकर यांचे माधुर्यपूर्ण गायन अशा जुन्या-नव्या कलाकारांच्या सांगीतिक मैफलीने  ‘स्वरयज्ञा’चा पहिला दिवस रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. 
 
4सूर, लय आणि ताल अशा त्रिवेणीतून साकार झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या सांगीतिक पर्वास न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर गुरुवारी सायंकाळी  मोठय़ा दिमाखात प्रारंभ झाला. स्वरोत्सवाचे चांदणो लिंपून घेण्यासाठी रसिकांची महोत्सवाला अभूतपूर्व गर्दी झाली होती. 
 
4नियोजित वेळेनुसार महोत्सवाच्या पहिल्या सत्रस प्रसिद्ध सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने सुरूवात झाली. त्यापूर्वी ज्येष्ठ नृत्यांगना सितारादेवी, संगमेश्वर गुरव, पाश्र्वगायक मन्ना डे, आनंद मोडक, संगीत समीक्षक मोहन कुलकर्णी आदी संगीत क्षेत्रतील विविध कलाकारांसह आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद ठकार आणि जयंत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
  ‘रूप पाहता लोचनी’
4किराणा घराण्याच्या लिलाताई घारपुरे आणि जयपूर घराण्याच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे गायनाचे धडे घेतलेल्या सानिया पाटणकर यांच्या माधुर्यपूर्ण गायकीने  संगीताची ‘सुरेल’ वातावरणनिर्मिती झाली. श्री रागातील विलंबित एकतालात ‘गुरूबिन कौन बताए’ ही पारंपरिक बंदिश त्यांनी अधिकाधिक खुलवली. त्यानंतर चैतन्य कुंटे यांची रचना असलेला मिश्र खमाज रागातील  ‘¬तु बरखा की आयी’ हा टप्पा सादर केला. माणिक भिडे यांचे ‘रूप पाहता लोचनी’ या त्यांच्या अभंगाने भक्तीचा रंग चढला. तबल्यावर त्यांना अविनाश पाटील, हार्मोनिअमवर रोहित मराठे, तानपु:यावर oुती अभ्यंकर, प्रीती सोहनी, सुगंधा उपासनी यांनी साथसंगत केली.
 
‘विरासत’चे आकर्षण
4भारतीय अभिजात संगीताला विशिष्ट उंची प्राप्त करून देणा:या 5क् सांगीतिक कुटुंबातील पिढय़ांचा वारसा छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी छायाचित्रंच्या माध्यमातून कॅमे:यात बंदिस्त केला आहे. महोत्सवातील ‘विरासत’ हे छायाचित्र प्रदर्शन रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पं. विनायकराव पटवर्धन - नारायणराव पटवर्धन, गंगूबाई हनगल - कृष्णाबाई हनगल, हिराबाई बडोदेकर - निशांत बडोदेकर, पं. कुमार गंधर्व- मुकुल शिवापुत्र, कलापिनी कोमकली-भुवनेश कोमकली, उस्ताद विलायत खान-सुजात खान, उ. रहितमत खान आदी विविध कलाकारांची छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. 
 
गुरुंच्या उपस्थितीत शिष्यांनी रंगवली मैफल
4संगीतमरतड पं. जसराज यांच्या शिष्यांची  मैफल अखेरच्या सत्रत रंगली. येत्या 28 जानेवारीला पं. जसराज वयाच्या 85व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांची कन्या दुर्गा जसराज यांनी पंडितजींना बोलते केले. विविध आठवणींचा कप्पा उलगडत पंडितजींनी रसिकांशी संवाद साधला. एकीकडे पंडितजी जागवीत असलेल्या आठवणी, तर दुसरीकडे त्यांच्या शिष्यांच्या बंदिशी असा अनोखा मिलाफ रसिकांना अनुभवता आला. पंडितजींच्या भारदस्त आवाजाचे सूर ऐकायला न मिळाल्याने रसिकांची थोडीफार निराशा झाली. 
4मात्र, त्यांच्या शिष्यवर्गाने ही उणीव भरून काढीत मैफलीला अनोखा साज चढविला. ‘अल्ला मेहरबान’,  ‘जोरी बाजे’,  ‘कोई नहीं है अपना’ या बंदिशी तृप्ती मुखर्जी, प्रीतम भट्टाचार्य यांनी सादर केल्या. रतन मोहन शर्मा यांच्या तराणा सादरीकरणाला  रसिकांनी  दाद दिली.  अखेरीस ‘गुरू की महिमा’ हे  भजन रंगले. तबल्यावर राजकुमार शर्मा, हार्मोनिअमवर मुकुंद पेटकर यांनी साथसंगत केली.
 
पुणोकरांची कलेविषयी जाण आणि आस्था पाहता त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला पाहिजे. आज माङया पाच शिष्यांना ऐकून घेतले. त्याच त्याच लोकांनी गाण्यापेक्षा  कुणीतरी आता नवीन पुढे येत राहिले पाहिजे.- पं. जसराज, ज्येष्ठ गायक
 
परिचयाने दडपण येते..
4सवाई गंधर्व हा महोत्सव नव्हे, तर एक संगीतपर्व आहे. या स्वरमंचावर आगमन होताना माझी जी प्रत्येक वेळेला ओळख करून दिली जाते, त्यामुळे मनावर दडपण येते. पुढील महोत्सवात कृपया किमान माझी तरी ओळख करू देऊ नका.. मी काय वाजवणार आहे, हे मलाच माहिती नसते.. आज साठ वर्षे संतूरवादन करीत आहे. कुठलीतरी शक्ती माङयाकडून वाजवून घेत आहे. त्यामुळे काही चूक झाली तर ती माझी आणि छान झाले तर ते गुरूजींचे आशीर्वाद आहेत, अशी प्रांजळ कबुली पं. शिवकुमार शर्मा यांनी दिली. तसेच, वेळेच्या मर्यादेमुळे कलाकारांसह रसिकांचाही रसभंग होत असल्याने वेळेची मर्यादा वाढवली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
गायकीची सुरेल अनुभूती 
4पं. राजन-साजन मिश्र यांचे शिष्यबंधू असलेल्या दिवाकर-प्रभाकर कश्यप यांच्या गायनातून घराणा गायकीची सुरेल अनुभूती रसिकांना मिळाली. ठुमरी, ख्याल यावर उत्तम प्रभुत्व असलेल्या कश्यप बंधूंनी अमरप्रिया रागाने गायनास प्रारंभ केला.  ‘नंद किशोर रंगरसिया’ ही झपतालातील विलंबित रचना त्यांनी सादर केली. ही बंदिश मध्य लयीसह तीनताल आणि द्रुततालात उत्तम आलापीच्या माध्यमातून त्यांनी खुलवत नेली.  
 
सादरीकरणाचा विशेष आनंद
4जगात प्रतिष्ठित असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या स्वरमंचावर प्रथमच संगीताच्या माध्यमातून कला सादर करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला विशेष आनंद  होत असल्याची भावना दिवाकर व प्रभाकर कश्यप बंधूंनी  व्यक्त केली. 
 
संतूरवादनाची रसिकांवर मोहिनी
4काश्मीर खो:यातील संतूरसारख्या तंतुवाद्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरमंचावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली. 
4संतूरचे टय़ूनिंग होईर्पयत महोत्सवात नीरव शांतता पसरली होती. आपल्या जादुई बोटांनी संतूरचे मंजूळ सूर छेडताच रसिकांच्या हृदयावर जणू मोरपिस फिरल्याचा भास झाला. 
4चारूकेशी रागात आलाप, जोड, झाला त्यांनी सादर केला. त्यांच्या संतूरवादनाने रसिकांवर मोहिीनी घातली. पं. शर्मा यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. विजय घाटे यांनी साथ दिली. संतूर का तबला, अशी काहीशी अवस्था रसिकांची झाली. तानपु:यावर  दिलीप काळे यांनी साथ केली.   
 
कर्नाटकी कजरीतून रसिकांना जिंकले
4तब्बल बारा वर्षानतर भीमण्णा जाधव यांच्या माध्यमातून रसिकांना  महोत्सवात ‘सुंद्री’ वादनाचा एक विलक्षण अनुभव मिळाला. सुंद्रीचे सूर छेडताच महोत्सवात विलक्षण शांतता पसरली. ‘भीमपलास’ रागातील धून त्यांनी सादर केली. याशिवाय भारतीय संगीतात फारशी प्रचलित नसलेला ‘कर्नाटक कजरी’ हा अभिनव प्रकार सादर करून त्यांना रसिकांना जिंकले. तानपु:यावर त्यांना पं. सातलिंगप्पा सायपल्लू, व्हायोलिनवर देवदत्त जोशी, तसेच सहसुंद्रीवादनाला यशवंत जाधव आणि व्यंकटेश मान व हार्मोनिअमवर शंकर जाधव आणि शैलेश जाधव यांनी साथसंगत केली.
..हे तर आपले भाग्य
4जगविख्यात सवाई गंधर्व महोत्सवाला आपल्या सुंद्री वादनाने सुरुवात झाली, हे आपले भाग्य आहे, अशा शब्दांत सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांनी भावना व्यक्त केल्या. वडिलांनी या महोत्सवात 195क् आणि 1952 मध्ये हजेरी लावली होती. त्या वेळी आपणही उपस्थित होतो. पंडितजींविषयीच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
 
कलावंताला हवा नवतेचा ध्यास
4पुणो : रूक्ष म्हणजे शास्त्रीय का? रसिकांना खरा आनंद देते ते शास्त्रीय. गाणो कितीही तालप्रधान झाले, तरी इम्पॅक्ट सुरांचाच राहतो. नवतेचा ध्यास असल्याशिवाय कलावंत होता येत नाही. सादरीकरण करताना मनात कन्फ्यूजन नसावे, अशी भावना ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केली.
4निमित्त होते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘अंतरंग’ या संवादात्मक कार्यक्रमाचे.  पं. पोहनकर यांच्याशी पं. विकास कशाळकर यांनी संवाद साधला. 
4एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘‘पं. भीमसेन जोशी, किशोरीताई, कुमारगंधर्व यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांना जवळून बघता आले. ही दिग्गज मंडळी एकमेकांविषयी आदर बाळगून होती. दिग्गज, ज्येष्ठ कलाकारांकडून जे मिळाले ते समजून घेतले.’’ अभिषेकीबुवांमुळे रिच वाटायला लागल्याचे त्यांनी नमूद केले.
4सूर ही ईश्र्वराने दिलेली देणगी आहे. लयीचा विचार मनुष्याने करायचा असतो. मनात कन्फ्यूजन नसल्याने सगळ्या प्रांतात कसे फिरता आले, याचे उदाहरण त्यांनी आपल्या गायनातून दिले. 
4प्रशांत पांडव (तबला), प्रमोद मराठे (हार्मोनियम), धनंजय जोशी (स्वर) यांनी साथसंगत केली.
4सुरुवातीस ‘षड्ज’ या भारतीय शास्त्रीय संगीताशी संबंधित ज्येष्ठ गायिका कल्पना झोकरकर यांची निर्मिती असलेला ‘एक सुरीला दरवेज - रजबअली खान’ हा लघुपट दाखविण्यात आला.