‘इन्ट्रिया’ प्रदर्शन उद्यापासून : दर्जेदार दागिने सणाचा आनंद करणार द्विगुणित नागपूर : संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ प्रदर्शनाचे शनिवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ यांच्या कल्पनेतून आविष्कृत झालेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ही नवी मालिका सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारी आहे. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन ११ व १२ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. करवा चौथच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन सणांच्या दिवसांत नागपूरकरांसाठी एक संधीच राहणार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नाविन्यपूर्ण व दर्जेदार हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार अनुभवायला मिळणार आहे. अत्यंत आगळेवेगळे असे हिऱ्यांचे दागिने व त्यात साधण्यात आलेला पारंपरिक संस्कृती व अत्याधुनिकतेचा संगम हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशाप्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक दागिन्यातून कलात्मकतेचे दर्शन होणार आहे.यंदाच्या वर्षी ‘इन्ट्रिया’चे आयोजन करवा चौथच्या मुहूर्तावर करण्यात आले आहे. आपल्या पत्नीला अत्युत्तम दर्जाचे दागिने भेट देण्याची ही अनोखी संधी पतींना लाभली आहे. हिऱ्याचे हे दागिने केवळ लग्न किंवा पारंपरिक समारंभासाठीच नाही तर सर्वप्रकारच्या समारंभात वापरण्याजोगे आहेत. विशेष म्हणजे महिलांसोबत पुरुषांसाठीदेखील अंगठी आदी दागिने येथे राहणार आहेत. व्हाईट गोल्ड, यलो गोल्ड आणि पिंक गोल्डचा उपयोग करून तयार करण्यात आलेले दागिने हे ‘इन्ट्रिया’चे वैशिष्ट्य राहणार आहे. यात महिलांसाठी ‘नेकलेस’ तर पुरुषांसाठी ‘कफलिंग्ज’ आणि ‘बटन्स’चे पर्याय उपलब्ध असतील. यात मोती, रुबी इत्यादींचादेखील उपयोग करण्यात आला आहे. ‘इन्ट्रिया’ची सुरुवात झाल्यापासून अत्यंत कमी कालावधीत याने लोकप्रियता मिळवली आहे. आज ‘इन्ट्रिया’चे नाव आघाडीच्या ज्वेलरी डिझाईन हाऊसमध्ये घेण्यात येते. ग्राहकांना तांत्रिकतेने परिपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तराचे दर्जेदार डिझाईन्स उपलब्ध करून देण्यासाठी ‘इन्ट्रिया’ नेहमीच तत्पर असते. ‘इन्ट्रिया’तील दागिन्यांत साधारणला असाधारण व असाधारणला अविस्मरणीय करण्याची क्षमता आहे. येथील दागिने हे एकमेवाद्वितीय असून परिधान करण्यासदेखील सोपे आहेत. प्रत्येक दागिने तयार करताना आधुनिकतेसोबतच पारंपरिक भारतीय डिझाईन्सवरदेखील भर देण्यात येतो. हिरे, पन्ना, माणिक यांच्यामुळे दागिन्यांच्या श्रीमंतीत अधिक भर पडते. यात लग्नाच्या दागिन्यांसोबतच नेकलेस, ब्रेसलेट यांचा समावेश आहे. मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेल्या ‘इन्ट्रिया’ने संपूर्ण भारतभर प्रदर्शनांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे.‘इन्ट्रिया’चा प्रत्येक दागिना हा स्टायलिश आणि ट्रेंडी असावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येते.(प्रतिनिधी)
हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार
By admin | Updated: October 10, 2014 01:00 IST